Latest

पुणे-सोलापूर महामार्ग : ताबा सुटलेल्या चारचाकीच्या धडकेत तरुण मुलगी ठार

backup backup

पाटस ; पुढारी वृत्तसेवा : पाटस (ता.दौंड जि.पुणे) हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्ग वर सोलापूर दिशेने भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाचे 'स्टेरिंग लॉक' होऊन अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्ग वर वाहनाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यावरून खाली जात मेंढपाळ तरुण मुलीला जोरदार धडक दिली. या अपघातात मेंढपाळ मुलगी जागीच ठार झाल्याची घटना आज (दि.१४)  दुपारी शनिवारी घडली आहे.

पुणे-सोलापूर महामार्ग वर झालेल्या या अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव सुमल विठ्ठल पडळकर (वय-१७ रा. गिरीम ता.दौंड,जि-पुणे) असे आहे. ही घटना शनिवारी (दि १४) दुपारी सव्वा दोन च्या सुमारास घडली.

पाटस (ता.दौंड) भागवतवाडी येथे सोलापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्या लगतच्या शेतात गिरीम येथील धनगर समाजातील मेंढपाळ दोन दिवसांपासून ठोकले आहेत.

दरम्यान चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या घोडा रस्त्यालगत जाईल म्हणून सुमल पडळकर त्या घोडीला हाकलण्यास गेली असता ताबा सुटलेले वाहन रस्त्याच्या खाली जाऊन पडळकरला जोरदार धडक दिली. यामध्ये तिचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

सुमलला वडील नसल्याने तिचा सांभाळ आई करीत होती तिला तीन भाऊ आहेत. अचानक झालेल्या या घटनेने सुमलच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे..

या घटनेची माहिती मिळताच पाटस पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे ,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल भालेराव व पोलिस खटके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT