Latest

तिघांची आत्महत्या; पोटच्या लेकीला दिला गळफास आणि नंतर पती-पत्नीनं जीवन संपवलं

निलेश पोतदार

नगर; पुढारी वृत्तसेवा : केडगाव परिसरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे.  संदीप दिनकर फाटक (वय 40), किरण संदिप फाटक (वय 32), मैथिली संदिप फाटक (वय 10) अशी मृतांची नावे आहेत. आर्थिक अडचणीतून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील तिघांची आत्महत्या झाल्‍याने खळबळ उडाली आहे.

संदीप फाटक हे बिस्कीट एजन्सीचा व्यवसाय करत होते. मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते. व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने व कर्ज वाढल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे.

काल रात्रीच्या सुमारास फाटक कुटुंबियांनी विरकर कुटुंबियांसह इतरांशीही फोनवरून गप्पा मारल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास अगोदर पोटच्या लेकीला गळफास दिल्यानंतर दोघा पती-पत्नीने गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT