Rakesh Roshan : राकेश रोशन यांच्या टकलेपणात दडलंय यशाचं रहस्य! | पुढारी

Rakesh Roshan : राकेश रोशन यांच्या टकलेपणात दडलंय यशाचं रहस्य!

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांचा आज वाढदिवस (६ डिसेंबर १९४९). एकेकाळी प्रसिद्ध अभिनेते म्हणूनही ते नावारुपास आले होते. त्यानंतर दिग्दर्शक क्षेत्रात अफाट काम केलं आणि एक महान दिग्दर्शक म्हणून भरपूर यश कमविलं. करण-अर्जुन, कोई मिल गया, क्रिष, क्रिष-२, कोयला, खुदगर्ज यांसारखे सुपरहीट सिनेमे त्यांनी बाॅलिवुडला दिले आहे. पण, त्यांच्या या यशाचं रहस्य त्यांच्या ‘टकले’पणात दडलंय? चला तर, नेमकां किस्सा काय आहे ते पाहू…

Rakesh Roshan

तुम्ही जेव्हा राकेश रोशन यांना पाहिलं असेल तेव्हा-तेव्हा त्यांच्या डोक्यावर एकही केस पाहिला नसेल. तुम्हाला वाटत असेल की, वयानुसार त्यांचे केस झडले असतील. पण, तसं अजिबात नाही. त्याच्या पाठिमागे एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. तो असा…  १९८७ सालची गोष्ट आहे. तेव्हा राकेश रोशन यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन म्हणून काम केले. ‘खुदगर्ज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी राकेश यांनी तिरुपती बालाजीला जाऊन आपल्या चित्रपटाच्या यशबद्दल नवस केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की, “जर माझा चित्रपट सक्सेस झाला तर, तिरुपती येथे येऊन माझे केस दान करेन”, असा नवस ते बोलले होते.

३१ जुलै १९८७ रोजी त्यांची खुदगर्ज ही फिल्म रिलीज झाली आणि बाॅक्स ऑफिसवर सुपरहीट झाली. पण, या यशामध्ये राकेश रोशन हे बालाजीला केस देण्याचे नवस विसरले. त्यांनी तो नवस फेडला नाही. पण, त्यांची पत्नी पिंकी यांना त्यांचा हा नवस माहीत होता. त्या सातत्याने त्या नवसाची आठवण करून देत राहिल्या.

शेवटी राकेश रोशन हे तिरुपती बालाजीला जाऊन सर्व केस दान केले. पण, त्यावेळी त्यांनी शपथ घेतली की, इथून पुढे कधीही माझ्या डोक्यावर एकही केस ठेवणार नाही. त्यानंतर राकेश रोशन (Rakesh Roshan) यशाच्या वाटेवर चालू लागले. त्यांचा दिग्दर्शकातील यशाचा प्रवास सुरू झाला. राकेश रोशन हे सध्या क्रिष-४ या सिनेमावर काम करत आहेत.

पहा व्हिडीओ : उमेश कामत आणि प्रिया बापटशी गप्पा

Back to top button