सोलापूर : रेल्‍वेत प्रवाशांना लुटणारा दरोडेखोर जेरबंद

ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण
ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण

मोहोळ ; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेत प्रवाशांना लुटणारा दरोडेखोर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आले आहे. या अट्टल दरोडेखोरांमुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. पोलिसांसमोर त्‍याचे जेरबंद करण्‍याचे आव्हान होते. मोहोळ पोलिसांच्या डी.बी. पथकाने प्रवाशांना लुटणारा दरोडेखोर जेरबद करून त्‍यांची दहशत मोडीत काढली आहे. रविवारी पोलिसांनी पाठलाग करुन अनिल उर्फ दादा रामदास पवार (रा. यल्लमवाडी ता. मोहोळ) असे त्याचे नाव आहे. २०१३ पासून त्याने मिरज, कुर्डूवाडी, सोलापूर लोहमार्ग हद्दीत तब्बल १३ दरोडे टाकले हाेते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी मोहोळ पोलिसांचे डीबी पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सोलापूर-पुणे महामार्गावर दोन इसम नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलजवळ थांबले होते.

इसमाने पोलिसांची गाडी पाहून काढला पळ 

त्यापैकी एकाने पोलिसांची गाडी पाहून तेथून पळ काढला.

त्यामुळे पोलीस पथकाला संशय आल्याने थांबलेल्या व्‍यक्‍तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली.

यावेळी त्यांनी स्वतःचे नाव लखन अशोक काळे असल्याचे सांगून पळून गेलेल्या इसमाचे नाव अनिल उर्फ दादा रामदास पवार (रा. यल्लमवाडी ता. मोहोळ) असल्याचे सांगितले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, 2013 पासून त्याने रेल्वेमध्ये विविध ठिकाणी तब्बल १३ दरोडे  टाकले असल्याचे समोर आले.पोलिसांनी पाठलाग करून कुरुल रोड परिसरात त्याच्या मुसक्या आवळल्या.

मिरज लोहमार्ग पोलिसात चार, कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसात ६ तर सोलापूर लोहमार्ग पोलिसात चार असे एकूण तेरा दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

मात्र मोहोळ डीबी पथकाचे इन्चार्ज हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे, पो.कॉ. सचिन पुजारी, पो.कॉ पांडुरंग जगताप, पो.कॉ. हरीदास थोरात यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केल्याने अनेक मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लखन काळे याच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

दोघांविरोधात मोहोळ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ न्यायालयाने दोन्ही आरोपींना ८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

डीबी पथकाच्‍या या धडक कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे व डी.बी. पथकातील अन्य कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news