Kasara Ghat 
Latest

ठाणे : कसारा घाटात दरोडेखोरांचा थरार; एक पोलीस कर्मचारी जखमी

मोनिका क्षीरसागर

कसारा (जि.ठाणे); शाम धुमाळ

आज (दि.०१) पहाटेच्या सुमारास कसारा घाटात बंद पडलेल्या वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अर्धा तासाच्या या थरारक नाट्यानंतर त्यातील एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांच्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

नाशिक दिशेहून मुबईकडे लोखंडी प्लेटा घेऊन जाणारा ट्रक (क्र. एम एच 40 बी जी 6165) हा रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाट उतरत होता. रात्रीच्यावेळी घाटात गाडीचा पाटा तुटला म्हणून, महामार्ग पोलिसाच्या मदतीने सदर ट्रक रस्त्याच्या कडेला लावण्यात आला. रात्रीच्या वेळी ट्रक चालकास महामार्ग पोलिसांनी गॅरेज उपलब्ध असलेल्या गॅरेजचा मोबाईल नंबर दिला आणि पोलीस गस्तीसाठी निघून गेले.यानंतर याचवेळी ट्रक जवळ एका पल्सर गाडीवरून तिथे तीन तरुण आले. त्यांनी अंगावर पूर्ण काळे कपडे परिधान केले होते. या 3 तरुणांनी गाडीतील चालकास आवाज देत उठवले आणि दादागिरी करायला सुरू केले. त्यानंतर त्यांनी ट्रकवर दगडफेक करताच, ट्रक चालकाने प्रसंगावधान ठेवत, महामार्ग पोलिसांना कॉल केला.

तोपर्यंत या तरुण दरोडेखोरांनी ट्रकमध्ये चढून, ट्रक चालक विकी खोब्रागडे व क्लीनर निधी वासनिक ह्यांना बेदम मारहाण करायला सुरूवात केली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतले. या दरम्यान महामार्ग पोलीस घोटी केंद्रचे माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे व संजय नंदन हे तिथे पोहचले. पोलीस आल्याचे समजताच दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जंगलात पळ काढला.

या तिघां दरोडेखोरांमधील एका मुख्य सूत्रधाराला, विजय रामदास ढमाळे (रा.इगतपुरी) याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवल्याने, दरोडेखोर  विजय ढमाळे याने पोलीस कर्मचारी गायकवाड यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला केला यामध्ये ते जखमी झाले. कसारा पोलिसांनी आरोपींकडील दुचाकी  (MH 15 HB 1075) जप्त करत, या तिघा दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT