बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर ( वय ९२) यांचे पुणे येथे शनिवार[ (दि. १७) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. अनंत मनोहर हे बेळगाव येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत होते. त्यांचे दीर्घकाळ बेळगाव येथेच वास्तव्य होते.
अधिक वाचा
मनोहर यांनी ललित लेखनात मोठे कार्य केले आहे. अरण्यकांड, ज्येष्ठ, पर्व, सचिन तेंडुलकर समग्र चरित्र, द्वारकाविनाश अशा त्यांच्या विविध कादंबऱ्या लोकप्रिय ठरल्या आहेत.
मनाोहर यांनी कादंबरी, कथा, ललित,स्फुटलेखन आदी साहित्य प्रकार हाताळले. त्यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते.
त्यांनी क्रिकेटवर विपुल लेखन केले. त्यांच्या पुस्तकांना मानाचे विविध पुरस्कार लाभले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे , सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचलं का ?