संग्रहित छायाचित्र 
Latest

चिपळूण : पावसाने हॉस्पिटलचा संपर्क तुटला, ११ कोरोना रुग्णांचा जीव गेला

स्वालिया न. शिकलगार

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण येथे पावसाने हॉस्पिटलचा संपर्क तुटला. यामध्ये ११ रुग्णांनी जीव गमावला आहे. तब्बल २४ तासांपेक्षा अधिक काळ पुरात असलेल्या चिपळूण येथील विदारक स्थिती झाली आहे. येथील अपरांत हॉस्पिटलमधील ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा – 

पुराने शहराला विळखा घातल्यानंतर अपरांत हॉस्पिटलमध्येदेखील पाणी शिरले. तेथे २१ रुग्ण उपचारासाठी ठेवण्यात आले होते.

त्यातील काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. हॉस्पिटलचा संपर्क तुटला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांचा काल गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता शेवटचा संपर्क झाला होता.

आज जसेजसे पाणी ओसरत आहे. तेथील परिस्थिती पुढे आली. तब्बल ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

अधिक वाचा – 

रत्नागिरी : ढगफुटीने हाहाकार; खेडलाही पुराचा वेढा

chiplun flood : हेलिकॉप्टरने मदतकार्य सुरु; संदेश वहन यंत्रणा कोलमडली

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : chiplun flood : पळूण, खेडमध्ये ढगफुटी सद‍ृश पावसाने महाप्रलय आला असून 2005 मध्ये आलेल्या पुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी, शिवनदी, तर खेडमधील जगबुडी नदीला महाप्रलय आला आहे.

दरम्यान, चिपळूण (chiplun flood) शहर गेल्या दोन दिवसापासून पाण्याखाली आहे. गुरुवारी रात्रीपासून मदतकार्याला वेग आला आहे. एनडीआरएफ, आर्मी, पोलीस, कोस्टगार्ड, नौदलाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पाणी पातळी चार फुटाने कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

चिपळुणातील संदेशवहन यंत्रणा कोलमडल्याने संपर्क तुटला आहे. पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेद्वारे शासकिय यंत्रणा संपर्कात आहे
कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरकडून बचाव कार्य शुक्रवारी सकाळी हाती घेण्यात आल आहे.

अधिक वाचा – 

चिपळूणमध्ये सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिक अडकून पडले आहेत चिपळूण व खेडमध्ये पुणे येथील एनडीआरएफच्या दोन तुकड्या बचावकार्य करत आहेत.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन व ग्रामस्थ यांचे बचाव कार्य सुरू आहे. शासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यांत महापूर आला असून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरीनजीकच्या टेंबे येथील एक महिला पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तिचा मृत्यू झाला आहे.

चिपळूणमध्ये महाप्रलय

चिपळूण बाजारपेठेसह, चिंचनाका, भोगाळे, विरेश्‍वर तलाव परिसर, मध्यवर्ती बस स्थानक, मुरादपुर, शंकरवाडी, मार्कंडी, अनंत आईस फॅक्ट्री परिसर, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मेहता पेट्रोल पंप, साई मंदिर परिसर, परशुराम नगर, काविळतळी, वडार कॉलनी, राधाकृष्ण नगर असा एकंदरीत बहादुरशेखनाका परिसरापर्यंत पुराचे पाणी आले होते.

चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या मुरादपूर रोडवर व परिसरात पाणी साचल्याने रेल्वेकडे जाण्याचा संपर्क तुटला. या भागातील नागरिक घरात अडकून पडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT