चंदगड; पुढारी ऑनलाईन : चंदगड : प्रचंड वेगाने वाहणारा ओढा ओलांडताना नागरदळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय २८) हा युवक पाण्यातून वाहून गेला. ही घटना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्यासोबत असलेल्या साथीदारही वाहून जात असताना ग्रामस्थांनी वाचवले.
अभिषेक व त्याचा मित्र कडलगे खु. येथे कामानिमित्त आले होते. पावसाने जास्तच जोर केल्याने कडलगे खु. नजीक असलेल्या ओढ्यावर पाणी आले होते. अभिषेक व त्याचा मित्र एकमेकांना हात धरून कडलगे- नागरदळे रस्ता ओलांडत असताना अभिषेक वाहून गेला.
त्या पाठोपाठ त्याचा मित्रही वाहून गेला. मात्र त्याने एका झाडाला घट्ट पकडून ठेवले. हा घडलेला प्रकार गावात समजताच दोरींच्या साहाय्याने बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र अभिषेक सापडला नाही.
राज्यात सर्वदूर पावसाचा जोर आहे. मुख्यतः घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे.
दरम्यान, आज गुरुवारी (दि.२२) हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकणात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत उद्या शुक्रवारी (दि.२३) मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचलं का?
पाहा फोटोज : ऑलिम्पिक स्पर्धेच्या लोगोमध्ये पाच रिंग का असतात?
[visual_portfolio id="11646"]