माविन गुदिन्हो आणि एलिना साल्ढाणा  
Latest

भाजप सरकारमधील मंत्री -आमदारांत वाद का उफाळला?

दीपक दि. भांदिगरे

पणजी; विलास ओहाळ : गोव्यात सध्या भाजप सरकारातील मंत्री विरुद्ध मंत्री, मंत्री विरुद्ध आमदार आणि आमदार विरुद्ध इच्छुक उमेदवार असा वाद सुरु आहे. निवडणुकीला काही महिने बाकी असताना भाजप सरकारमधील या वादाला आणखी हवा मिळाली तर भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

भाजप सध्या निवडणुकीच्या मूडमध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनसंपर्क दौरा करायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातून आपल्या दौर्‍यास प्रारंभ केला आहे. त्यात त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघातील विकास कामांचे उद्घाटन आणि शुभारंभ असा अंतर्भाव करून घेतला आहे.

एका बाजूला तानावडे व डॉ. सावंत प्रचार दौऱ्यात मग्न आहेत. तोपर्यंत तिकडे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि माजी मंत्री तथा आमदार एलिना साल्ढाणा यांच्यात शाब्दिक खटके उडाले.

यामागे कारण म्हणजे भूमिपूत्र विधेयक. हे विधेयक मंजूर झाले असते तर माविन यांना दाबोळी मतदारसंघात फायदा झाला असता. स्थलांतरित मतदारांची याठिकाणी भरपूर संख्या आहे. त्यामुळे त्या विधेयकाचा फायदा या लोकांना झाला असता, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते.

कुठ्ठाळी हा त्यांचा पूर्वीचा मतदारसंघ आणि सध्या तेथे एलिना साल्ढाणा या भाजपच्या आमदार आहेत. रेल्वे चौपदरीकरण व कोळसा साठवणुकीस त्यांनी कडाडून विरोध केला. कदाचित पक्षविरोधी भूमिका घेतल्याने माविन यांनी कुठ्ठाळीत पुन्हा लक्ष घातले आहे.

दाबोळीतील अंदाज घेऊनच माविन पुन्हा कुठ्ठाळीत परतण्याचा प्रयत्न करीत असावेत असे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यातूनच साल्ढाणा यांना गुदिन्हो यांचा आपल्या मतदारसंघातील हस्तक्षेप पचणी पडला नसावा. साल्ढाणा यांनी यापूर्वीही पक्षश्रेष्ठीकडे अशा घटनांची माहिती दिली आहे.

सध्या राज्यात या वादाची चर्चा सुरु झाली आहे. गोवा प्रभारी सी. टी. रवी राज्यात असताना असा मंत्री व आमदार यांच्यातील वाद पुढे येणे हे पक्षाला निश्चितच घातक ठरू शकते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत |

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT