पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक शहरात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस गुरुवारी (दि.२२) सकाळी थांबल्याने गोदावरी नदीला आलेला पूर बुधवारी रात्री ओसरला आहे. मात्र गटारी व नाल्यांमधून वाहून आलेल्या कचऱ्यामुळे गोदावरी नदीवरील गोदाघाट परिसराला बकाल स्वरूप आले आहे.
अधिक वाचा
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे आज (दि.२२) नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
अधिक वाचा
मंगळवार व बुधवार अशा दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधारेमुळे परिसरातील लहान मोठे नदी नाले, पावसाळी गटारी दुथडी वाहत होते. हे सर्व पाणी गोदावरी नदीला येऊन मिळाल्याने बुधवारी रात्री गोदावरीला गटारीच्या पाण्याचा पूर आला होता.
काळपट रंग असलेल्या या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
अधिक वाचा
आज सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूर ओसरला असून, गोदाघाट परिसरात रात्री पाण्यात वाहून आलेला कचरा व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांकडून परिसराची स्वच्छता सुरू असून, कचरा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दुतोंडया मारुतीच्या कमरेला पाणी
रात्री आलेल्या यंदाच्या पहिल्याच पुराचे पाणी दुतोंडया मारुतीच्या कमरेला लागले होते. मात्र गुरुवारी सकाळी पाण्याची पातळी कमी झाली. यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी तातडीने दुतोंडया मारुती मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घातले.
हेही वाचलं का?