Latest

कोल्हापूर : चाकुचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार ; तरूणास सक्त मजुरी

backup backup

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर मधील महाविद्यालयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अरविंद महादेव वडर (वय २७) याला जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तरुणीवर चाकुचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली होती.

बलात्कार पीडित मुलगी महाविद्यालयात जाताना तसेच घरी परतत असताना अरविंद वडर हा तिची छेड काढायचा. पीडितेला तिला थांबवून तुझ्या घरचे माझ्याशी लग्न करून द्यायला का तयार नाहीत. अशी विचारणा करून चाकुचा धाक दाखवून मारहाणही करायचा. मार्च २०१८ ला पीडितेला जबदस्तीने गाडीवर बसवले. लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

नातेवाईकांनी याबाबतची फिर्याद राजारामपुरी पोलिसात दिली. त्यानुसार अरविंदवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्याचे कामकाज ज्यादा सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी ९ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सह न्यायाधिश ए. एस. महात्मे यांनी आरोपीला १० वर्षे सक्त मजुरी आणि ३१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

Kolhapur Crime : आईचे तुकडे करणारा नराधम फासापर्यंत कसा पोहोचला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT