डोंबिवलीतील एका मुलीच्या पोटातून तब्बल ६५० ग्रॅमचा केसाचा गोळा बाहेर काढला  
Latest

केस खाण्याची सवय पडली महागात, मुलीच्या पोटातून काढला 650 ग्रॅम गोळा

backup backup

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : कल्याणमध्ये राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीला लहानपणापासून डोक्याचे केस खाण्याची सवय जडली होती. हीच सवय तिच्या जीवावर बेतण्याआधीच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल ६५० ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा काढला.

कल्याणमध्ये आपल्या कुटूंबासोबत ती मुलगी राहत आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय जडली होती.

विशेष म्हणजे मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सुटावी म्हणून खूप प्रयत्न केले. परंतु सवय काही केल्या सुटली नाही. गेल्या आठवड्यात अचानक मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे कल्याणातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले.

रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचे वजन अवघे २०किलो होते. त्यांनतर डॉक्टरांनी पोटाचा सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस अडकले असल्याचे आढळून आले.

शिवाय मागच्या दोन महिन्यांपासून तिला जेवण देखील जात नव्हते. अखेर हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, अश्या रुग्णाच्या पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब केला जातो.

परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती.

म्हणूनच ओपन सर्जरीचा मार्ग निवडला आणि भला मोठा केसाचा गोळा या मुलीच्या पोटातून काढण्यात आम्हाला यश मिळाल्याने तिचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT