नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशभरात कोरोना संसर्ग झालेल्या संख्येतील चढ-उतार मागील २४ तासांमध्येही कायम राहिला. कोरोना संसर्ग झालेले ४१ हजार ५०६ नवे रुग्ण आढळले. ४१ हजार ५२६ जण कोरोनामुक्त झाले. ८९५ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
अधिक वाचा
देशभरात सध्या ४ लाखा ५४ हजार ११८ रुग्ण सक्रीय आहेत. आतापर्यंत २ कोटी ९९ लाख ७५ हजार ६४ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर चार लाख ८ हजार ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३७ कोटी ६० लाख ३२ हजार ५८६ जणांचे लसीकरण झाले आहे.
पाहा फोटो : उत्तर प्रदेशात दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास नोकरी नाही
[visual_portfolio id="5203"]
अधिक वाचा
शनिवारी दिवसभरात ४२ हजार ७६६ नवे रुग्ण आढळले होते. तर एक हजार २०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. रुग्ण मृत्यू संख्या वाढल्याने चिंता वाढल होती. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने अनेक राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक राज्यामंध्ये दुकाने, बाजारपेक्षा, जिम आणि रेस्टॉरंट सुरु झाली आहेत.
हेही वाचलं का ?
व्हिडिओ पहा : कोरोना आणि आरोग्य