Latest

कर्णधार विराट कोहली – कोच माईक हेसन जोडी जमणार?

backup backup

कर्णधार विराट कोहली आता माईक हेसन यांच्याबरोबर टीमची बांधणी करणार आहे. युएईत होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित १४ व्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर बेंगलोरने आपल्या संघाचा हेड कोच बदलला आहे. आता संघाचे क्रिकेट ऑपरेशन संचालक असलेले माईक हेसन यांच्याकडे हेड कोच म्हणून अतिरिक्त भार सोपवण्यात येणार आहे.

आरसीबीचे उपाध्यक्ष राजेश मेनन यांनी सांगितले की, 'आयपीएलचा उर्वरित हंगाम युएईत होणार आहे. ज्यावेळी हंगाम सुरु होईल त्यावेळी उत्सुकता शिगेला पोहचली असेल. आरसीबीचे हेड कोच सायमन कॅटिच यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आरसीबीसोबत केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा. दरम्यान हा हंगाम संपेपर्यंत माईक हेसन संघाचे हेड कोच म्हणून काम पाहतील. सध्या ते आरसीबीचे क्रिकेट संचालक आहेत.'

झाम्पाच्या जागी हसरंगा

याचबरोबर राजेश मेनन यांनी सांगितले की, श्रीलंकेचा ऑल राऊंडर वनिंदू हसरंगाला आरसीबीच्या संघात सामिल करुन घेण्यात आले आहे. तो अॅडम झाम्पाची जागा घेणार आहे. हसरंगाने नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या टी – २० मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्याने ३ सामन्यात ७ विकेट घेतल्या होत्या. कर्णधार विराट कोहली हसरंगाचा यझुवेंद्र चहलच्या साथीने युएईमध्ये उत्तम प्रकारे उपयोग करुन घेण्याची शक्यता आहे.

कर्णधार विरोट कोहली अजून एका श्रीलंकन खेळाडूला आपल्या संघात सामिल करुन घेण्याची शक्यता आहे. दुशमनता चमीरा देखील आरसीबीत सामिल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तो डॅनियल सॅम्सची जागा घेणार आहे. तसेच आरसीबीने टीम डेव्हिडला फिन अॅलनच्या जागी संघात स्थान दिले होते.

आरसीबीचे भारतीय खेळाडू बंगळुरुमध्ये जमणार

आरसीबीचा कर्णधार विरोट कोहली सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. मात्र आरसीबीच्या संघातील भारतीय खेळाडू आणि संघ व्यवस्थापक हे आजपासून बंगळुरुमध्ये जमण्यास सुरुवात करणार आहेत. त्यानंतर संघ सात दिवस क्वारंटाईन होईल. त्यांची दर तीन दिवसांनी कोरोना चाचणी होणार आहे.

त्यानंतर आरसीबीचा संघ २९ ऑगस्टला चार्टड फ्लाईटने युएईसाठी निघणार आहे. याच दरम्यान विदेशी खेळाडू २९ ऑगस्टला युएईमध्ये दाखल होतील. त्यानंतर युएईमध्ये पुन्हा ६ दिवसांचे क्वालंटाईन संघासाठी सक्तीचे करण्यात आले आहे. कर्णधार विराट कोहली इंग्लंडमधील कसोटी मालिका संपल्यानंतर थेट युएईमध्ये आरसीबीच्या कळपात सामील होईल.

आरसीबी युएईमध्ये आपला पहिला सामना २० सप्टेंबरला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना अबु धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : महागाई विरोधात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT