सातारच्या पश्चिमेकडे असलेल्या कण्हेर परिसरात गेले तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने कण्हेर धरण पूर्ण भरले आहे.
गुरुवारी रात्री पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वेण्णा नदीला महापूर आला आहे. किडगाव व म्हसवे पूल पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कण्हेर धरण जलाशयात संततधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शिवाय धरणाच्या पश्चिमेकडे धुवाधार पाऊस पडल्याने धरणातील आवक 13912 क्यूसेक्स आहे.
यामुळे धरण 70 टक्के भरल्याने गुरुवारी रात्री 11 वा. धरणाच्या चारीही वक्र दरवाजे 1 मीटरने उचलून धरणाच्या सांडव्यावरून 6744 क्युसेकस पाणी वेण्णा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. वेण्णा नदी तुडुंब भरून वाहत असून या नदीवरील किडगाव व महस्वे पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या स्मशानभूमी व अनेक शेतीला जलसमाधी मिळाली आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने गावे संपर्कहीन होऊन हा मार्ग रहदारीसाठी बंद झाला आहे. किडगाव व महस्वे येथील नागरिकांना साताराकडे येण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने नाहक त्रास होत आहे.
नदीकाठच्या अनेक शेतीमध्ये पाणी घुसल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. परिसरात गतवर्षी एकूण 493 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.पुढील 24 तासात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
धरणात पाणी सुरू राहणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगावी,अशा सूचना धरण विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचले का?
पाहा फोटो : ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच रिंग का असतात?
[visual_portfolio id="11646"]