सांगली ः आपच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज्याचे प्रभारी दीपक सिंगला.  
Latest

‘आप’ सांगली मनपा लढविणार : दीपक सिंगला

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सामान्य कार्यकर्त्यांची बांधणी करून आम आदमी पक्ष सांगली जिल्ह्यात प्रस्थापितांना पर्याय देणार आहे. सांगली महापालिका निवडणूक आप लढविणार आहे, अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी दीपक सिंगला यांनी दिली.

पक्षाचा शुक्रवारी सांगलीत कार्यकर्ता व पक्षप्रवेश मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दिल्ली आणि पंजाबमधील निवडणूक निकाल व सत्ता सामान्यांसाठी राबविल्याने पक्षाबद्दल जनतेत सहानभूती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जनता जागरूक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही आगामी काळात बदल होईल. सांगलीतून नेहमी सामाजिक, राजकीय क्रांतीची सुरुवात झाली आहे. हा जिल्हा चळवळीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे 'आम आदमी पक्ष' येथेही क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. याची सुरुवात महापालिका निवडणुकीतून केली जाईल.

यावेळी महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी महादेव नाईक, आप महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे, उपसंयोजक किशोर माध्यान, आप महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक सामान्य कार्यकर्त्यांनी आपमध्ये प्रवेश केला.

मेळाव्यास आपचे राज्य संघटक विजय कुंभार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन कदम, आप पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला, आप वैद्यकीय विंगचे राज्य कमिटी सदस्य डॉ. अमोल पवार, अशफाक शेख, आरिफ मुल्ला, सागर भोसले, डॉ. परमानंद भोसले, राम पाटील, महेश गायकवाड, श्रीरंग ढोले, शेखर गंगाधर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT