Latest

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री म्हणते, ‘अरुंधतीची वेदना अक्षरशः जगलेय’

स्वालिया न. शिकलगार

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्री म्हणते, 'अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलेय'. आई कुठे काय करते मालिकेत भावनिक वळण आले आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेरीस मोडला.

अधिक वाचा- 

घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं. अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना वेदना झाल्या. त्याचं वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अश्रू अनावर होत होते.

अधिक वाचा – 

अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरने साकारली आहे. तिने एक भावनिक पोस्ट केली आहे.

पोस्टमध्ये मधुराणी म्हणाल्या, '२५ वर्षं जो संसार इतका जीव जडवून केला. तो डोळ्यासमोर उन्मळून पडताना पाहणं. जी माणसं जीवापाड जपली त्यांना सोडून जाणं.

अधिक वाचा – 

आपलं आत्तापर्यंतचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकणं. नव्याने सुरुवात करणं. हे अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. किती वेदनेतून जात असेल ती.

अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलोय

आम्ही सगळेच अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलोय. या सगळ्याला आपण प्रेक्षकांनी देखील इतका मायाळू प्रतिसाद दिला. आम्ही भारावून गेलोय.

असंख्य फोन आणि मेसेजेस मधून हे जाणवतं की, अरुंधतीमध्ये सगळे किती गुंतले आहेत.

पुन्हा पुन्हा ही अशी भूमिका करायला मिळाल्याबद्दल आभार. परमेश्वर आणि रंगदेवतेचे आभार यावेळी मानावेसे वाटतात.

स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, लेखिका नमिता वर्तक यांच्या ऋणात मी असेन. मुग्धा गोडबोले, दिग्दर्शक रवींद्र करमरकर, सहकलाकारांच्या मी कायम ऋणात असेन.

ही मालिका आणि आजवरच्या अरुंधतीच्या प्रवासात प्रेक्षकांनी मोलाची साथ दिली आहे. यापुढेही अशीच साथ मिळेल ही आशा आहे.

त्यासाठी पाहायला विसरु नका ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हे देखील वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT