हैदराबाद ; पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज (Prakash raj) यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना दुखापत झाल्याचे समजते . याबाबत खुद्द प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. चाहत्यांमध्ये कोणताही गैरसमज पसरू नये यासाठी याबाबत ट्विट केल्याचे त्यांनी सांगितले आहे. हैदराबाद येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
प्रकाश राज (Prakash raj) यांचा अपघात झाल्यावर यांच्यावर सोशल मीडियात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. या विषयाला पूर्णविराम देण्यासाठी प्रकाश राज यांनीच याबाबत खुलासा केला आहे.
माझा मोठा अपघात झाला आहे. यात माझे काही भाग फ्रॅक्चर झाले आहे. आता मी हैदराबाद येथील माझे डॉक्टर मित्र डॉ. गुरुदेवा रेड्डी यांच्याकडे उपचारासाठी जात आहे.
अपघातात झालेल्या इजेवर रेड्डी योग्य उपचार करतील काळजीचे कोणतेही कारण नाही. मी ठीक आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. माझ्याबद्दल सकारात्मक विचार करा…' ट्विटच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, प्रकाश राज यांचा सहकलाकार अभिनेता आणि निर्माता बंधाल गणेश आणि नवीन मोहम्मदी यांनी देखील त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
नुकताच राज यांचा नेटफ्लिक्सवर 'नवरस' हा सिनेमा रिलीज झाला. यात राज यांची अतिशय छोटी भूमिका असली तरी ती लक्षात राहणारी आहे.
याचबरोबर त्यांचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत.
यात केजीएफ २, पोन्नीयन सेल्वम, पुष्पा यांचा समावेश आहे.
प्रकाश यांनी हे ट्विट केल्यानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांची तब्येतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशा आशयाच्या कॉमेन्ट केल्या आहेत.
एका युझरने लिहिले आहे की, 'सर, तुम्ही लवकर बरे व्हा. आम्हाला तुम्हाला कायम मोठ्या पडद्यावर बघायचे आहे. हॉस्पिटलच्या बेडमध्ये नाही…'