परळी वैजनाथ: पुढारी वृत्तसेवा: अंगार-भंगार घोषणा कसल्या देता….हे तुमचे संस्कार आहेत का? अशा शब्दांत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना सुनावले. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. यावेळी हा प्रकार घडला.
जनआशीर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरून झाला. मात्र भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी दिलेल्या काही घोषणांवरुन पंकजा मुंडे चांगल्याच भडकल्या.
अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, ,अशा शब्दांत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.
सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचे स्वागत केले.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरच्या पायऱ्यांवर आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर गोपीनाथ गडावरून जनआशीर्वाद यात्रेला पंकजा मुंडे यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला.
परंतु या दौऱ्यात काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताना 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है' अशा प्रकारच्या घोषणा दिल्या.
अशा प्रकारच्या घोषणा ऐकल्यावर पंकजा मुंडे यांनी समर्थकांना सुनावले.
'आपले संस्कार चांगले आहेत, मी तुम्हाला हेच शिकवलंय का?,अंगार भंगार घोषणा काय देताय… असं वागणं आपल्याला शोभत नाही,'
अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना सुनावले.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल असे वाटत होते. मात्र अनपेक्षितपणे भागवत कराड आणि भारती पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे मुंडे समर्थकांनी दोघी बहिणींवर पक्षांतरासाठी दबाव आणला होता. मात्र, पंकजा मुंडे आणि प्रीतम या दोघीही शांत आहेत. काही दिवसांपूर्वी ओबीसी मेळावा घेऊन त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते.