Youtuber accident 
Latest

Youtuber accident: 300 किमी वेग गाठण्याच्या प्रयत्नात युट्यूबरने गमावला जीव

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: Youtuber accident : ताशी 300 किमी वेग गाठण्याच्या प्रयत्नात डेहराडूनमधील एका प्रसिद्ध युट्यूबर आणि त्याच्या बाईक रायडर मित्राचा दुर्दवी अंत झाला आहे. अगस्त्य चौहान हा दुचाकीवरून दिल्लीला जात होता. त्यावेळी ही दुर्घटना उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस वे वर घडल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

यमुना एक्स्प्रेस वे वर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून असे दिसून आले आहे की, अगस्त्य चौहान त्याची कावासाकी निन्जा ZX10R – 1,000cc सुपर बाईक ताशी 300 किमी वेगाने चालवत होता. वेग जास्त असल्याने अगस्त्य चौहानच्या दुचाकीला धडक बसली आणि दुचाकीचे तुकडे तुकडे झाले. त्याचे हेल्मेटही तुटले. डोक्याला मार लागल्याने अगस्त्य चौहान याचा जागीच मृत्यू (Youtuber accident) झाला. तसेच शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा झाल्या होत्या, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी उत्तराखंड पोलिसांशी संपर्क साधत, त्याच्या कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली. यानंतर या  युट्यूबरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अशी माहिती मीडिया रिपोर्ट्नुसार (Youtuber accident) देण्यात आली आहे.

उत्तराखंडमधील डेहराडूनमधील चक्रता रोड कपरी ट्रेड सेंटरमध्ये राहणारा अगस्त्य चौहान 'प्रो-राइडर 1000' नावाने यूट्यूब चॅनल चालवत होता. त्याने अनेकदा चॅनलवर दुचाकी चालवतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. बुधवारी दिल्लीला येताना देखील तो ताशी 300 किमी वेगाने बाइक चालवून त्याच्या यूट्यूब चॅनेलसाठी व्हिडिओ बनवत होता. यावेळी त्याच्या हेल्मेटवर 360-डिग्री कॅमेराही बसवण्यात आला होता. ज्याच्या मदतीने तो त्याच्या बाईक आणि वेगाचा व्हिडिओ शूट करत होता. मात्र काळाने घाला घातला आणि यमुना एक्स्प्रेस मार्गावर भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना अगस्त्यचा (Youtuber accident) अपघात झाला, त्यात त्याचा दुर्दवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT