

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pakistani Local : पाकिस्तानात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. अनेक नागरिकांना दररोजच्या जेवण मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. या परिस्थितीत एका हताश पाकिस्तानी तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हा हताश तरुण आम्हाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान हवे आहेत, अशी याचना अगदी आगतिक होऊन अल्लाहकडे करत आहे. पाकिस्तानी यु ट्यूबरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एएनआयने याचे वृत्त दिले आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी यु ट्यूबर सना अमजद याने देशाच्या आर्थिक परिस्थितीवर स्थानिकांची प्रतिक्रिया घेतली. यामध्ये शेहबाज शरीफ सरकारच्या विरोधात राग काढत असताना या तरुणाने आम्हाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान हवे आहेत. म्हणजे आमच्या पाकिस्तानातसुद्धा आम्ही टमाटे, चिकन वाजवी दरात खरेदी करू शकलो असतो, असे म्हटले आहे.
यू ट्यूबर सना अमजद यांनी यापूर्वी अनेक पाकिस्तानी मीडिया हाऊसमध्ये पत्रकारिता केली आहे. यावेळी पाकिस्तानात सध्या जीवंत राहण्यासाठी पाकिस्तानात पळून जा मग भलेही तुम्ही भारतात जाऊन आश्रय घ्या, अशा घोषणा दिल्या जात आहे, रस्त्यावर तसे पोस्टर लावले जात आहे. याविषयी विचारले असता या तरुणाने म्हटले आहे, मी पाकिस्तानात जन्माला आलो नसतो तर बरे झाले असते.
फाळणी झाली नसती तर…
या हताश तरुणाने पुढे म्हटले आहे, फाळणी झाली नसती तर चांगले झाले असते. कारण फाळणी झाली नसती तर तो आणि त्याचे देशबांधव वाजवी किमतीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकले असते आणि दररोज रात्री त्यांच्या मुलांना पोटभर खाऊ घालू शकले असते.
पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला नसता तर आम्ही टोमॅटो 20 रुपये किलो आणि चिकन 150 रुपये किलो दराने आणि पेट्रोल 50 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करू शकलो असतो.
"आपल्याला इस्लामवादी राष्ट्र मिळाले हे दुर्दैव आहे, पण आपण येथे इस्लामची स्थापना करू शकलो नाही," असेही तो पुढे म्हणाला.
पाकिस्तानात राहणे किती वेदनादायी आहे याबाबत बोलत असताना नरेंद्र मोदी हे आशेचा किरण ठरले असते असे म्हणत तो म्हणाला मोदी हे आमच्या पंतप्रधानांपेक्षा खूप चांगले आहेत. त्यांचे लोक त्यांचा आदर करतात त्यांना फॉलो करतात. आमच्याकडे जर नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान असते तर आम्हाला नवाझ शरीफ किंवा बेनझीर किंवा इम्रानची गरज नसती इतकेच काय आम्हाला दिवंगत पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही गरज नसती. असे म्हणत त्यांनी आम्हाला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे आहेत. कारण केवळ तेच देशातील सर्व खोडकर घटकांना सामोरे जाऊ शकतात. भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, तर आम्ही कुठेही नाही, असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचे खूप कौतुक केले.
तो म्हणाला, "मी मोदींच्या राजवटीत जगायला तयार आहे. मोदी हे एक महान माणूस आहेत, ते वाईट माणूस नाहीत. भारतीयांना टोमॅटो आणि चिकन माफक दरात मिळत आहे. असे म्हणत तो पुढे म्हणाला जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना रात्री खायला घालू शकत नाही, त्यावेळी तुम्ही ज्या देशात जन्माला आला आहात त्याची बदनामी सुरू करतात.
व्हिडिओत बोलताना तो स्थानिक डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, मी सर्वशक्तिमानकडे प्रार्थना करतो की आम्हाला मोदींसारखे पंतप्रधान द्या. त्यांनी आमच्या देशावर राज्य करावे. तसेच पाकिस्तानी लोकांनी स्वतःची तुलना भारताशी करणे थांबवायला हवे कारण दोन्ही देशांमध्ये तुलना होऊ शकत नाही.
हे ही वाचा :