

पुढारी ऑनलाईन डेस्क : युट्यूब आता क्रियाशील लोकांसाठी पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. मात्र, एका रशियन ७ वर्षांच्या मुलीने जो काही गल्ला जमवला आहे ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत.
रशियाच्या अनास्तासिया रडझिन्स्कायाची (anastasia radzinskaya) कमाई पाहून अनेकजण चक्रावून गेले आहेत. अनास्तासिया सोशल मीडिया स्टार असून तिचे व्हिडिओज लाखांमध्ये नव्हे, तर कोट्यवधींमध्ये पाहिले जातात. त्यामुळे तिची महिन्याची कमाई सद्धा एक कोटींहून अधिक आहे. वयाच्या सातव्या वर्षी ती तब्बल १४० कोटींची मालकीण झाली आहे.
अनास्तासियाचा जन्म २०१४ मध्ये झाला. त्यानंतर तातडीने ती न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर असल्याचे दिसून आले. त्यामुळे आई वडिलांनी आपली नोकरी सोडून Like Nastya युट्यूब चॅनेल सुरु केले. या चॅनेलची सुरुवात अनास्तासियासाठी शैक्षणिक प्रकल्प म्हणून सुरुवात केली होती.
अनास्तासियाचा पॉप्यूलर क्रिएटर्समध्ये समावेश झाला आहे. गेल्यावर्षी तिने २०० कोटींची कमाई केली होती. या यशामध्ये फक्त तिच्या आई वडिलांचे योगदान आहे.
Daily Star ने दिलेल्या वृत्तानुसार अनास्तासिया आप्लाय लग्जरी फॅमिली हॉलिडेवर कंटेंट क्रिएट करते. तो कंटेंट ती YouTube और Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करते. तिचा कंटेंट मुलांवर केंद्रित असून पौष्टिक सामग्री तसेच आकर्षक हॉलिडे और महागड्या खासगी जेट प्रवासातील फोटो शेअर करते.
चॅनेल सुरु केल्यानंतर काही वर्षांनी कमाई सुरु झाली. त्यानंतर अनास्तासियाच्या आई वडिलांनी वेगवेगळा कंटेंट क्रिएट करण्यास सुरुवात केली. काही कालावधीमध्ये अनास्तासिया YouTube मधून सर्वांधिक पैसे कमवणाऱ्या टॉप १० जणांच्या यादीत आली.
या मुलीच्या व्हिडिओवर लोक किती प्रेम करतात हे पाहायचं झाल्यास एक व्हिडिओ पुरेसा आहे. तिने चार वर्षांपूर्वी, अपलोड केलेल्या व्हिडिओला ९० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या चॅनेलला ८६ मिलीयन लोकांनी सब्सक्राईब केलं आहे. या चॅनेलला एकूण ६ हजार ९०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
हे ही वाचलं का ?