पुणे मांडवगण : रागाच्या भरात बहिणीने आत्महत्या केल्यानंतर चिडून जाऊन पत्नीची धारदार हत्याराने खून केल्यानंतर स्वतःचे जीवन संपविण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या झालेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समीर तावरे असे मयत युवकाचे नाव आहे.
शिरूर तालुक्याला हादरवून टाकणारी ही घटना गुरुवारी (दि. १८) मांडवगण फराटा येथे घडली होती. या घटनेत कौटुंबिक वादातून रागाच्या भरात बहिणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी हा मृतदेह विहिरीत आढळून आला होता.
यानंतर घरी येऊन समीर याने धारदार हत्याराने पत्नी वैशाली हीची हत्या केली होती. यानंतर स्वतः देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
यानंतर त्याला खासगी दवाखान्यात दौंड येथे दाखल करण्यात आले होते.
परंतु शनिवारी (दि. २०) त्याचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रागाच्या भरात हे कृत्य झाल्याचे समोर आले होते.
समीर तावरे यांच्या पश्चात मुलगा यशवर्धन समीर तावरे (वय ११), मुलगी शरयु समीर तावरे (वय ७), वृध्द आई कमल तावरे आणि वडील भिवाजी असा परिवार आहे.
या लहान मुलांचे आई-वडिलांचे छत्रच हरपल्याने मुलांना अनाथ व्हायची वेळ आली.
या मुलांचे संगोपन कोणी करायचे याचा प्रश्न उभा राहिला आहे.
केवळ रागामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.