Latest

प्रतीक्षा संपली… नवी Yamaha RX100 ‘या’ वर्षी येणार बाजारात!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Yamaha RX100 हे नाव उच्‍चारलं की चर्चेकडे बाईकप्रेमींचे लक्ष वेधतेच. ९०च्‍या दशकात तरुणाईला या बाईकचे खास आकर्षण होते. तरुणांकडे Yamaha RX100 असणं हा प्रतिष्‍ठेचे मानला जात असे. पिकअप, फायरिंग आणि स्‍पीड या तिन्‍ही बाबींमुळे तरुणाई या बाईकवर फिदा झाली होती. मात्र काळाच्‍या ओघात बाईक बंद झाली. मात्र आजहीस्‍टायलिश बाईक म्‍हटलं की यामाहा 100 चे नाव घेतले जाते. आता पुन्‍हा एकदा नवीन लुक आणि इंजिनसह यामाहा कंपनी RX100 बाईकचे मॉडेल लॉन्‍च करण्‍याची शक्‍यता आहे.

भारतात पुन्‍हा लॉन्‍च होवू शकते Yamaha RX100

नुकतेच यामाहा मोटार इंडियाचे चेअरमन ईशीन शीहाना यांनी सांगितले की, आगामी काळात यामाहा RX100 नवीन लूकमध्‍ये बाजारात आणली जाईल. आम्‍ही यासाठी प्रयत्‍नशील आहोत. या बाईकला बीएस६ इंजिन असेल. उत्‍कृष्‍ट
स्टाईल आणि फीचर्ससह नवी बाईक आणणे हे मोठे आव्‍हान असते. यासाठी आमचे प्रयत्‍न सुरु आहेत. २०२६ पर्यंत कंपनी नवीन यामाहा यामाहा RX100 लॉन्‍च करु शकते, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

१९८५ मध्‍ये भारतात झाली होती लॉन्‍च

यामाहा RX100 ही बाईक सर्वप्रथम १९८५ मध्‍ये भारतीय बाजारपेठेत दाखल झाली. अल्‍पावधीतच ती लोकप्रिय ठरली.

यामाहा RX100 चे १९९६पर्यंत तिचे देशात उत्‍पादन झाले. मात्र यानंतर या मॉडेलची विक्री बंद झाली. मात्र या दहा वर्षांमध्‍येही देशातील तरुणाईची ही आवडती मोटारसायकल ठरली होती.आता नवीन RX100 कशी असेल याकडे बाईकप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT