parab rane 
Latest

anil parab on nitesh rane : कोण नितेश राणे ? अनिल परबांची नितेश राणेंवर खोचक टीका

backup backup

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याचे काम सुरू केलंय. त्यामध्ये आज मुंबई इथं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आमदार नितेश राणेंवर (anil parab on nitesh rane) जोरदार टीका केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात अनेक एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे दोघे करत असतानाच आज आमदार नितेश राणे (anil parab on nitesh rane) यांनीही या आंदोलकांची भेट घेवून ठाकरे सरकारबरोबरच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. यावर मंत्री परब यांनी कोण आहे नितेश राणे? त्याच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, असं प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची नितेश राणेंची पात्रता नसल्यानेच त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नसल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर कालअखेर जवळपास २ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून, यापुढेही ही कारवाई अधिक कडक करु असा इशारा दिला. आंदोलकांना भडकावण्याचे काम केले जात आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे होत असलेले नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही परब यांनी केलाय.

'कामावर या, आम्ही संरक्षण देऊ'

गेल्या काही दिवसांपासून एसटीचे अनेक कर्मचारी कामावर पुन्हा रूजू होत आहेत. जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण देवू तर जे अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला. विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने कमिटी गठीत केलीय. त्या कमिठीसमोर कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडावं. त्यानंतर येणारा समितीचा जो काही अहवाल असेल तो कर्मचाऱ्यांबरोबरच आम्हालाही मान्य असेल असे स्पष्ट केले. विरोधातील राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजत असून, आपलं नुकसान होवू नये यासाठी कामावर परता असं आवाहनही परब यांनी केलं.

' ते कर्मचाऱ्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत '

कामगारांना भडकवून हे आंदोलन जाणीवपुर्वक चिघळलं जात आहे. हे काम जे करत आहेत ते कामगारांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. कोरोना काळात एसटीचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून, एसटी आणखी खड्ड्यात जावू नये यासाठी कामगारांनी आत्मचिंतन करावं आणि हा संप मिटवावा असे परब यांनी आवाहन केले.

हे ही वाचा :

व्हिडिओ पहा : कसं जगत आहे एस टी कर्मचाऱ्यांचे कुटूंब

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT