Latest

PM Narendra Modi : काँग्रेसने देशाचा विकास होऊ दिला नाही; पंतप्रधान मोदींचा पुन्हा हल्लाबोल

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाही, वादविवाद भारतात शतकानुशतके चालू आहेत. पण काँग्रेसची अडचण ही आहे की त्यांनी घराणेशाहीशिवाय कधीही विचार केला नाही. भारतातील लोकशाहीला कुटुंबावर आधारित पक्षांचा सर्वात मोठा धोका आहे. हे आपल्याला मान्य करावे लागेल. जेव्हा कुटुंबाला कोणत्याही पक्षात सर्वोच्च स्थान असते, तेव्हा सर्वात पहिला आघात हा प्रतिभेवर होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मंगळवारी ते राज्यसभेत बोलत होते.

जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी देशाचा विकास होऊ दिला नाही. आता विरोधी पक्षात असताना ते देशाच्या विकासात अडथळे आणत आहेत. ते आता 'राष्ट्र'वर आक्षेप घेत आहेत. जर 'राष्ट्र' ही कल्पना असंवैधानिक असेल तर तुमच्या पक्षाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस का म्हणतात?, असा सवाल त्यांनी केला.

महात्मा गांधींच्या इच्छेनुसार काँग्रेस संपली असती तर लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त झाली असती. भारत परकीय दृष्टिकोनाकडे न पाहता राष्ट्रीय संकल्पांच्या मार्गावर चालला असता. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा डाग लागला नसता, असे आरोप पंतप्रधान मोदी य़ांनी केले आहेत.

पंडीत नेहरूंवर टीका केल्याबद्दल मजरूह सुल्तानपुरी आणि धरमपाल या दोघांनाही तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणीच्या काळातही किशोर कुमार इंदिरा गांधी यांच्यापुढे नतमस्तक झाले नाहीत आणि त्यांना रेडिओवर गाण्यास बंदी घालण्यात आली होती. जेव्हा लोक एका कुटुंबाच्या मतांशी सहमत नसतात तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश कसा लावला जातो, हे आम्हाला माहीत आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

कोविडच्या काळातही आपल्या देशातील तरुणांनी जागतिक स्तरावर स्टार्टअपच्या संख्येच्या बाबतीत भारताला टॉप-३ मध्ये नेले आहे. कोविड महामारी दरम्यान जगभरातील १५० देशांना मदत करुन भारताने ली़डरशीपची भूमिका घेतली आणि जगाने आमच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना केले.

कोरोना पूर्व काळाच्या तुलनेत लॉकडाऊननंतर नोकरभरतीत दुपटीने वाढ झाली आहे. नॅसकॉमच्या (NASSCOM) अहवालात हे अधोरेखित करण्यात आले आहे. अलिकडील काही वर्षांत सुमारे २७ लाख लोकांना आयटी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या आहेत. हा एक नवीन उच्चांक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT