पुढारी ऑनलाईन डेस्क
फेसबुक लाईव्ह करत कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने पश्चिम बंगाल हादरला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये अपमानामुळे व्यथित झाल्याने फेसबुक लाईव्ह करत या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील २४ परगना जिल्ह्यातील बकखाली परिसरात पती अशोक नस्कर, पत्नी रीता नस्कर हे मुलगा अभिषेक नस्कर व मुलगी पूनम नस्कर राहत होते. पूनम हे एका स्वयंनिर्भर मंडळात काम करत होती. तिने संस्थेत १४ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप मंडळातील महिला सदस्यांनी केला होता. ८ जानेवारी रोजी स्वयंनिर्भर मंडळातील काही महिला त्यांच्या घरी आल्या. यावेळी त्यांनी पूनमसह संपूर्ण कुटुंबाचा अपमान केला. त्यांनी पूनम व तिच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढले. यानंतर ते पूनमला घेवून गेले. यावेळी पूनमसह तिच्या कुटुंबातील सदस्यांना हाताला बांधून गावातून फिरविण्यात आले. तसेच बेदम मारहाणही करण्यात आली.
या अपमानास्पद वागणुकीमुळे अशोक, रीता आणि अभिषेक कमालीचे व्यथित झाले होते. हे तिघेही जंगलात गेले. येथे फेसबूक लाईव्ह करत त्यांनी गळफास लावून घेवून आत्महत्या केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी पूनम हिची सुटका केली असून ५ महिलांना अटक केली आहे.त्याची चौकशी सुरु आहे.
हेही वाचलं का?