पुढारी ऑनलाईन डेस्क
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणातील सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत असणारी मैत्री उघड झाल्याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline and Sukesh) सध्या चर्चेत आहे. या दोघांचा जवळीक साधणारा फोटोही मागील काही दिवस सोशल मीडियावर मागील व्हायरल होत आहे. आता जॅकलिनबरोबरील संबंधांबाबत स्वत: सुकेश यानेच खुलासा केला आहे. यामुळे जॅनलिनच्या अडचणीत भर पडली आहे.
मनी लाँड्रिंगप्रकरणी सुकेश सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने आपले वकील अनंत मलिक यांना कारागृहातून एक पत्र लिहिले आहे. हे पत्र मलिक यांनी माध्यमांना दिले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने
स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच यामध्ये जॅकलिकचाही उल्लेख आहे.
सुकेशने पत्रात नमूद केले आहे की, मी जॅकलिन फर्नांडिसबरोबर रिलेशनशिपमध्ये होताे. त्यामुळे मी तिला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू
दिल्या. माझ्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांशी जॅनलिन व अन्य बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा कोणाताही संबंध नाही. बॉलीवूडमधील एका मित्रानेच मला टार्गेट केले. बॉलीवूडमध्ये मी चित्रपट करु नये यासाठीच त्यानेच माझ्या बदनामीचे कारस्थान रचले. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही, असा दावाही त्याने या पत्रातून केला आहे.
'ईडी'च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश याने जॅकलिन फर्नांडिसला १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये विविध प्रकारची आभुषणे, हिरेजडीत दागिने, क्रॉकरी, चार फ्रेंच जातीची मांजरे (एका मांजराची किंमत अंदाजे एक लाख रूपये) आणि ५२ लाख रूपये किंमतीचा एक घोडा पण आहे. त्याचबरोबर सुकेशने जॅकलीनचा भाऊ आणि बहिणीलाही मोठी रक्कम पाठवली होती. त्यानंतर 'ईडी'ने जॅकलिनच्या जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती.त्याचबरोबर सुकेशने नोरा फतेहीलाही बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. त्याची एकूण किंमत एक कोटींहून अधिक होती. तिहार तुरुंगातून 200 कोटी वसूल केल्याप्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.
'ईडी'ने आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात असताना, अधून मधून जॅकलिनशी मोबाईलच्या माध्यमातून बोलत होता. तो जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने चेन्नईला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटही बुक केली होती. तसेच जॅकलीन फर्नांडिससाठी मुंबई ते दिल्लीचे चार्टर्ड फ्लाइटही बुक केले होते.
हेही वाचलं का?