विश्वसंचार

अल्झायमर टाळण्यासाठी ‘हे’ करा!

अनुराधा कोरवी

लंडन ः उतारवयात होणार्‍या मेंदूशी संबंधित आजारांमध्ये अल्झायमरचा समावेश होतो. हे डिमेन्शियाचे सर्वाधिक प्रमाणात आढळणारे रूप आहे. यापूर्वी अल्झायमर यासारख्या मानसिक आरोग्याशी संबंधित विकारांकडे वयाच्या हिशेबानेच पाहिले जात होते. मात्र, आता असंतुलित जीवनशैली आणि निकृष्ट आहार अशा काही कारकांमुळे चाळीशीतही या आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. हा आजार झालेल्या लोकांच्या स्मरणशक्‍तीवर विपरित परिणाम होतो आणि त्यांची निर्णयक्षमता बाधित होते.

अल्झायमर वर कोणताही रामबाण उपचार अस्तित्वात नाही! त्यामुळे हा आजार होऊ नये याची काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे.
हा एक चेतासंस्थेशी संबंधित आजार असून त्यामध्ये मेंदूच्या पेशींचा र्‍हास होऊ लागतो. जर कुटुंबातील कुणाला अल्झायमर झालेला असेल तर इतरांनी याबाबत अधिक सावधगिरी बाळगावी लागते. याचे कारण म्हणजे अल्झायमरला अनुवंशिक विकारही समजले जाते. अशा लोकांनी आहाराबाबतही विशेष काळजी घ्यावी लागते. काही पदार्थांचे सेवन हे जोखिम वाढवणारे ठरू शकते.

संशोधनातून असे दिसून आले आहे की प्रोसेस्ड आणि प्रिझर्व्हड फूड या रोगाचा धोका आणि गांभीर्य वाढवतो. अल्झायमरच्या धोक्यापूसन दूर राहण्यासाठी चीज, ब—ेड आणि प्रोसेस्ड मीटबरोबरच जॅम, जेली आणि फ्रोजन फूडसारख्या पदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे. 'प्रोसिडिंग्ज ऑफ न्यूट्रिशन सोसायटी'च्या एका अभ्यासात म्हटले आहे की 'ब' जीवनसत्त्व आणि फोलेटच्या सेवनाने वाढत्या वयाबरोबर होणार्‍या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत मिळते. फोलेटयुक्‍त आहार चेतासंस्थेला मजबूत करतो. तसेच मेंदूचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी मदत करतो.

'न्यूरोलॉजी' नावाच्या नियतकालिकातील माहितीनुसार दिवसातून किमान एकदा हिरव्या पानांची भाजी खाणार्‍या लोकांना स्मरणशक्‍तीशी निगडीत आजार होण्याचा धोका कमी असतो. अशा भाज्यांमध्ये फोलेट, 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व, फायबर आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. योग्य आहाराबरोबरच नियमित योग-व्यायाम, लोकांशी संवाद, आवडीचे छंद जोपासणे, ताणतणावाचे योग्य नियोजन आदी उपाय गरजेचे आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT