विश्वसंचार

Sahara’s Eye : ‘सहारा’च्या डोळ्याचे उलगडले रहस्य!

Arun Patil

वॉशिंग्टन : Sahara's Eye : जगाच्या पाठीवर अनेक अनोखी द़ृश्ये पाहायला मिळत असतात. त्यामध्ये अनोखी बेटं, डोंगर आणि खड्ड्यांचाही समावेश असतो. 'द ग्रेट ब्ल्यू होल' या समुद्रातील विवराचाही त्यामध्ये समावेश आहे. आकाशातून पाहिल्यावर हे विवर निळ्याशार सुंदर डोळ्यासारखेच दिसते. असाच एक डोळा आफ्रिकेत सहारा वाळवंटामध्ये आहे. त्याला सहारा वाळवंटाचा किंवा आफ्रिकेचा डोळा असे म्हटले जाते. या डोळ्याची निर्मिती कशी झाली याबाबत अनेक मतमतांतरे आहेत.

संबंधित बातम्या :

हा 'डोळा' (Sahara's Eye) 50 किलोमीटर लांब व रुंद आहे. त्याला 'रिचट स्टॅक्चर' असे म्हटले जाते. हा डोळा इतका विशाल आहे की आकाशातूनही त्याची आकृती स्पष्टपणे पाहायला मिळते. जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी या डोळ्याचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याबाबत बरेच वाद आहेत. काही लोक तर चक्क त्याचा संबंध एलियनशीही जोडत असतात. अर्थातच त्यामध्ये तथ्य नाही.

काही संशोधकांच्या मते, सहाराचा हा संपूर्ण परिसर पूर्वी पूर्णपणे समुद्राने आच्छादलेला होता. हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला आणि हा परिसर वाळवंटात रूपांतरीत झाला. पाणी कमी होत असताना पाणी व वाळूने मिळून या डोळ्यासारख्या निळ्या रंगाच्या आकृतीची संरचना निर्माण केली. मात्र, ही प्रक्रिया नेमकी कशी घडली हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. Sahara's Eye

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT