ऑस्ट्रियात आहे स्वर्गाची शिडी! | पुढारी

ऑस्ट्रियात आहे स्वर्गाची शिडी!

व्हिएन्ना : एकापेक्षा एक डोंगरपठारे पार करत नव्या उंचीवर जाण्याचे स्वप्न असण्यात गैर काहीच नाही. पण, खरोखरच एखाद्या ठिकाणी थेट स्वर्गाची सफर करण्याची संधी मिळत असेल तर आपण ती कधी सोडू का? कधीच सोडणार नाही. ऑस्ट्रियात एका ठिकाणी अशीच एक हवेत उंचच्या उंच शिडी असून आश्चर्य म्हणजे त्याला ‘स्वर्गाची शिडी’ याच नावाने ओळखले जाते.

ऑस्ट्रियातील गोसॉकम रेंजमधील सॅल्झकॅमरगट रिसॉर्ट एरियात या लोकप्रिय शिड्या अस्तित्वात आहेत. नॅशनल जिओग्राफिकनुसार, या शिड्यांची निर्मिती लोखंड, अन्य धातू व केबलच्या मिश्रणातून झाली आहे. त्यांची उंची 43 मीटर इतकी आहे आणि जमिनीपासून शिड्यांची उंची 700 मीटर इतकी आहे.

मॅसिमो या हँडलवर याचा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काहीच मिनिटांत तो व्हायरलदेखील झाला. दरम्यान, स्वर्गाची शिडी हा लाईफटाईम एक्स्पेरियन्स असल्याचे नॅशनल जिओग्राफिकचे छायाचित्रकार क्वेन श्रॉक यांनी म्हटले आहे. या शिडीची सफर आजमावणार्‍या काही साहसवीरांनी मात्र ही चढाई दिसते तितकी अजिबात सोपी नसल्याचे म्हटले आहे. जेस डॅलेस या पर्यटकाने साध्या शिडीऐवजी दगडी पायर्‍या असत्या तर त्या अधिक विश्वासार्ह असत्या, अशी टिपणी केली. केबल कारमधून या ठिकाणी पोहोचता येते आणि त्यानंतर शिड्यांनी वर जायचे, अशी याची रचना राहिलेली आहे.

Back to top button