विश्वसंचार

Kelsey Grubb: पावलं मागे वळवू शकणारी महिला

Arun Patil

नवी दिल्ली : भुताखेतांबाबत ज्या काल्पनिक गोष्टी असतात त्यामध्ये त्यांच्या उलट्या पावलांचाही समावेश असतो. याचा मतितार्थ इतकाच की, माणसाला पावलं वळवण्यासारखे प्रकार करता येणार नाहीत; मात्र एक महिला (Kelsey Grubb) असे करू शकते. तिच्याकडील ही कला किंवा क्षमता पाहून अनेक लोक थक्क होतात.

ही महिला आपल्या दोन्ही पावलांना बर्‍याच अंशी मागे फिरवू शकते. याबाबत तिच्या नावाची गिनिज बुकमध्येही नोंद झाली आहे. केल्सी ग्रुब (Kelsey Grubb) असे या महिलेचे नाव. 32 वर्षांची केल्सी न्यू मेक्सिकोमध्ये राहते. ती तिचे पाय 171.4 अंशांपर्यंत मागे फिरवू शकते. केल्सी म्हणाली, माझे पाय खूपच लवचिक आहेत. मात्र, त्याची मलाही जाणीव नव्हती. बहुतेक लोक त्यांचे पाय काही अंशच फिरवण्यात यशस्वी होतात.

सुरुवातीला मलाही वाटले की, मी 90 अंशांपर्यंतच असे करू शकेन; मात्र मला ज्यावेळी याबाबतच्या रेकॉर्डबाबत समजले, त्यावेळी मी त्याचा सराव करण्यास सुरुवात केली. अखेर याबाबतचा विक्रम माझ्या नावावर झाला. केल्सीच्या नावे पावले मागे वळवण्याचा विक्रम महिला गटात आहे, तर पुरुष गटात असा विक्रम अमेरिकेच्या आरोन फोर्डच्या नावावर आहे. तो त्याचे पाय 173.03 अंशांपर्यंत फिरवू शकतो. केल्सीला या कौशल्याचा फायदा आणखी एका कामासाठी होतो. आईस स्केटिंगमध्ये तिला हे उपयोगी पडते, असे तिने म्हटले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT