विश्वसंचार

Expensive sandals : जगातील सर्वात महागडे सँडल

Arun Patil

दुबई : आधुनिक काळात चप्पल, सँडल किंवा बूटांच्या किंमतीही अफाट असल्याचे पाहायला मिळते. अर्थातच अशा महागड्या पादत्राणांची निर्मिती मौल्यवान वस्तुंपासून केलेली असते. जगातील सर्वात महागडे सँडलही (Expensive sandals) असेच आहे. या सँडलची किंमत तब्बल 1.7 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.23 अब्ज रुपये आहे. हे सँडल सोने व हिरे वापरून बनवले आहे.

अब्जावधी रुपयांची ही सँडल (Expensive sandals) संयुक्त अरब अमिरातीमध्ये लाँच करण्यात आली होती. ही सँडल शुध्द सोने आणि अनेक हिरे यांचा वापर करून बनवलेली आहे. या सँडलचे डिझाईन करण्यासाठीच नऊ महिन्यांचा कालावधी लागला. या सँडलला 'पॅशन डायमंड शू' असे नाव देण्यात आले आहे. या सँडलवर शेकडो हिरे जडवण्यात आले आहेत.

तसेच यामध्ये 15-15 कॅरेटचे दोन इम्पोजिंग डी-फ्लॉलेस डायमंड्सही लावलेले आहेत. (Expensive sandals)सँडलची ही जोडी यूएईमधील 'जदा दुबई'ने 'पॅशन ज्वेलर्स'च्या साथीने बनवली आहे. 'जदा' हा ब्रँड दुबईत हिरे जडवलेल्या सँडल्ससाठी प्रसिध्द आहे. यापूर्वी 'डेबी विन्घम हाय हिल्स' ही सँडल जगातील सर्वात महागडी म्हणून प्रसिध्द होती. तिची किंमत 1.9 अब्ज रुपये होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT