विश्वसंचार

Planets : अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व?

Arun Patil

वॉशिंग्टन : अंतराळाच्या, (planets) ब्रह्मांडाच्या या आदी-अंत नसलेल्या अफाट पसार्‍यात केवळ पृथ्वी नामक ग्रहावरच जीवसृष्टी आहे असे म्हणणे हे खरे तर 'कुपमंडूक' वृत्तीसारखेच आहे. मात्र, अद्यापही परग्रहावरील जीवसृष्टीचा ठोस पुरावा सापडलेला नाही, हे तितकेच खरे आहे. अर्थात याबाबत बड्या देशांकडून लपवाछपवी सुरू आहे का, असाही प्रश्न अनेकांना पडत असतो. आपल्याच ग्रहमालिकेतील अनेक ग्रहांच्या चंद्रांवर द्रवरूपात पाण्याचे अस्तित्व असल्याचे संकेत आहेत. अशा ठिकाणी सूक्ष्मजीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टी असू शकते. 'नासा'च्या माजी संशोधिका असलेल्या व भारतीय वंशाच्या डॉ. अनिता सेनगुप्ता यांनी तर याबाबत भन्नाट दावा केलेला आहे. फक्त पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व असल्याचा दावा त्यांनी केला.

डॉ. अनिता सेनगुप्ता या 'नासा'च्या माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता आहेत. (planets) पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक टाईम ट्रॅव्हलर तसेच संशोधक एलियन्सबाबत अनेक दावे करतात. खरच एलियन्स म्हणजेच परग्रहवासी अस्तित्वात आहेत का? याबाबत संशोधन सुरू आहे. तसेच कोणत्या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत देखील संशोधन सुरू आहे. मंगळ आणि चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.

यासाठी 'नासा'ने अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा 'नासा'ने हाती घेतल्या आहेत. यावर अविरत संशोधन सुरू आहे. सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत. यापैकी पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. मात्र, इतर ग्रहावर देखील जीवसृष्टी अस्तित्वात आहे का किंवा होती का? याबाबत देखील संशोधन सुरू आहे. गुरूच्या चंद्रावर जीवसृष्टी असू शकते. कारण तिथे बर्फाळ समुद्र आहे. येथे कदाचित जीवसृष्टी असू शकते. तसेच शनीच्या चंद्रावरही सेंद्रिय पदार्थ आहे. तिथेही जीवन असू शकते अथवा अमिबासारखे एक पेशी जीव अस्तित्वात असू शकतात असा दावा डॉ. अनिता सेनगप्ता यांनी केला आहे.

.हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT