पुढारी ऑनलाईन डेस्क : काल झालेल्या आशिया चषकातील अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने तब्बल 1,020 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले. अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया कपमधील सामन्यात त्याने 122 धावांची नाबाद इनिंग खेळली. विराट कोहलीने या खेळीचे श्रेय पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला दिले आहे. (Virat Kohli)
विराट कोहलीने जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. त्याने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 122 धावांची नाबाद इनिंग खेळली होती. रोहित शर्माने विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहलीला सलामी देण्याची संधी मिळाली. त्याने 53 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचे हे पहिले शतक आहे. (Virat Kohli)
विराट कोहलीने आपल्या शतकाचे श्रेय पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला दिले आहे. या खेळीनंतर एका मुलाखतीत विराट कोहली म्हणाला, 'मी माझ्या अंगठीला किस केले. माझ्यासाठी गोष्टींचा दृष्टीकोन ठेवण्यासाठी तुम्ही मला येथे एक व्यक्ती म्हणून उभे असलेले पाहता. ती अनुष्का आहे. हे शतक त्याच्यासाठी आणि आमची मुलगी वामिकासाठीही आहे. जेव्हा तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असते जी गोष्टींचा दृष्टीकोन ठेवून बोलत असते.
विराट कोहलीने आशिया चषकापूर्वी मोठा ब्रेक घेतला. तो वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला नव्हता. विराट पुढे म्हणाला, 'मी परत आलो तेव्हा मी निराश झालो नाही. सहा आठवड्यांच्या सुट्टीनंतर मी ताजेतवाने झालो. या सुट्टीमुळे मला पुन्हा खेळाचा आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे.
विराट कोहलीने 2019 मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. गेल्या अडीच वर्षांनी खूप काही शिकवलं, असं त्याने सांगितले. विराट म्हणाला, 'गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवलं. मी काही दिवसांत 34 वर्षांचा होणार आहे. खरं तर मला धक्काच बसला. हा शेवटचा फॉरमॅट आहे ज्यात मी शतकाचा विचार केला. मला माहित आहे की तेथे खूप चर्चा होत आहे परंतु संघ नेहमीच उपयुक्त आहे.
हेही वाचा :