Queen Elizabeth : हैदराबादच्या निजामने राणी एलिजाबेथला दिला होता ‘300 हिरेजडित प्लॅटिनम हार’ भेट (पाहा फोटो) | पुढारी

Queen Elizabeth : हैदराबादच्या निजामने राणी एलिजाबेथला दिला होता '300 हिरेजडित प्लॅटिनम हार' भेट (पाहा फोटो)

पुढारी ऑनलाइन डेस्क : ब्रिटनची सर्वाधिक काळ सेवा करणाऱ्या राणी एलिझाबेथ Queen Elizabeth द्वितीय यांचे स्कॉटलंडमधील बालमोरल वाड्यात निधन झाले. तिचे 96 व्या वर्षी निधन झाले. दिवंगत राणी एक फॅशन आयकॉन होती आणि तिच्याकडे जगातील सर्वात महाग दागिन्यांचा संग्रह होता. ज्यामध्ये हैदराबादच्या निजामाने 1947 मध्ये राणीला लग्नासाठी भेट म्हणून दिलेला सर्वात प्रतिष्ठित नेकपीस होता.

असफ जाह सातवा हा हैदराबादचा शासक (किंवा निजाम) होता, जो त्यावेळेस ब्रिटीश वसाहतींच्या अधिपत्याखाली होता. तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता, म्हणून तो राजकुमारीला  खरोखरच नेत्रदीपक लग्न भेट देऊ शकला.

निजामाने लंडनमधील कार्टियरच्या फर्मला सूचना दिल्या की राजकुमारी एलिझाबेथने स्वत: लग्नाची भेट निवडावी आणि अंदाजे 300 हिऱ्यांचा हा प्लॅटिनम नेकलेस निवडला गेला. एलिजाबेथने पुढे तिच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रसंगी हा हार घातला.

तसेच निजामाने राणीला प्रसिद्ध ‘हैदराबाद टियारा’ देखील भेट दिला होता ज्यात इंग्रजी गुलाबांवर आधारित 3 वेगळे करता येण्याजोग्या फुलांचे ब्रोचेस होते, सर्व हिऱ्यांनी बनवलेले आणि प्लॅटिनममध्ये सेट केले होते.

दोन्ही तुकडे प्लॅटिनममध्ये सेट केलेल्या हिऱ्यांचे बनलेले होते. 1935 मध्ये कार्टियरने बनवलेल्या नेकलेसमध्ये फुलांच्या डिझाइनमध्ये बसवलेल्या हि-यांचे जटिल काम केले आहे. Queen Elizabeth

हे ही वाचा :

Back to top button