उमरखेड : मृत्‍यूनंतरही खडतर प्रवास; अंत्‍यसंस्‍कारासाठी पुराच्या पाण्यातून काढली वाट

अंत्‍यसंस्‍कार
अंत्‍यसंस्‍कार
Published on
Updated on

उमरखेड ; पुढारी वृत्‍तसेवा : देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची वानवा आहे. अनेक ठिकाणी चक्क नाल्याच्या पुरातून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागतो. उमरखेड उपविभागातील महागाव तालुक्यात येणार्‍या माळकिन्ही येथे हे भयावह वास्तव समोर आले आहे.

ग्रामीण भागात कुठे स्मशानभूमी अभावी, तर कुठे दहन शेडअभावी मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अंतिम प्रवाससुद्धा खडतर आहे. याचे ज्वलंत उदाहरण माळकिन्ही येथे बुधवारी दिसून आले. हे गाव भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणून नावारूपास आहे. परंतु, तेथील स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाइकांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नाल्याच्या पुरातून वाट काढावी लागते. माळकिन्ही येथील अविनाश कलाने (वय ४०) यांचा उपचारांदरम्यान ५ सप्टेंबरला शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

त्यानंतर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी आणला. त्यावेळी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. अंत्यसंस्कार करण्यासाठी इतरत्र जागा नसल्याने नाल्याच्या पैलतीरावर असलेल्या दहनशेडमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे नातेवाइकांनी ठरविले. परंतु पाऊस थांबता थांबेना. पावसामुळे नाल्याला जोरदार पूर आला होता. नाल्याच्या पैलतीरावर जाण्यासाठी रस्ता किंवा पूल नसल्याने व अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ होत असल्याने नातेवाइकांनी मृतदेह घेत एकमेकांच्या साहाय्याने छातीपर्यंत पाणी असलेल्या नाल्याच्या पुरातून वाट काढली. मृतदेह पैलतीरावर नेऊन अंत्यसंस्कार केले.​​​​​​​

लोकप्रतिनिधीं विरुद्ध गावकऱ्यांमध्ये रोष!

माळकिन्ही हे गाव हिंगोली लोकसभा व उमरखेड विधानसभा क्षेत्रात येते. खासदार हेमंत पाटील व आमदार नामदेव ससाणे हे दोन्ही सत्ताधारी लोकप्रतिनिधी  या समस्येकडे लक्ष देत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना नाल्याकाठी अंत्यविधी करावा लागतो. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र, अद्याप सुविधा उपल्बध झाली नाही.

गजानन काळे,उपसरपंच, माळकिन्ही

स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

शीतल लहाने, सरपंच, माळकिन्ही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news