virushka Alibaug Villa  
Latest

Virat-Anushka Alibaug Villa : विरुष्काचा अलिबाग येथील बंगला दिसतो तरी कसा?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा (Virat-Anushka Alibaug Villa ) अलिबाग येथे नवा आशियाना आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, विराट-अनुष्काचा हा आलिशान बंगला आतून दिसतो तरी कसा? (Virat-Anushka Alibaug Villa )

विराट-अनुष्का प्रत्येक अपडेट्स आपल्या चाहत्यांसाठी देत असतात. त्यांच्याविषयी सर्वकाही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता त्यांच्या अलिबाग येथील घराचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे सुंदर घर पाहून तुम्हीही म्हणाल, 'घर हो तो ऐसा.' मुंबईजवळील अलिबाग येथे हा लक्झरी बंगला आहे. या बंगल्याची पहिली झलक समोर आली आहे.

या बंगल्याचे डिझाईन कुणी केले माहिती आहे का? केप टाऊनच्या आर्किटेक्ट वर आधारित हे डिझाईन असून ते ऋतिक रोशनची पत्नी सुझान खान केले आहे. या बंगल्यात चार बेडरूम आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे इको-फ्रेंडली घर आहे. येथे स्पा, वेलनेस सेंटर, जॉगिंग ट्रॅक, पूल आणि कॅफे आहे. १० जणांची बैठक असणारे डायनिंग टेबल, खासगी पूल, काचेची भिंत, लिव्हिंग रुम, हाय सिलींग आणि व्हाईट सोफा तसेच घराच्या दोन्ही बाजूला हिरवळ आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कपलने १९.२४ कोटी रुपयांची ही संपत्ती आहे.

अनुष्‍का शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑक्‍टोबर महिन्‍यात गायक किशोर कुमार यांचा मुंबईतील बंगला भाड्याने घेतला होता. या बंगल्‍यात त्‍यांनी रेस्‍टॉरंट सुरु केले आहे. तसेच त्‍यांनी वरळी येथील ओमकार अपार्टमेंटमध्‍ये ३५ व्‍या मजल्‍यावरील फ्‍लॅट खरेदी केला आहे. रिपोर्टनुसार, या अलिशान फ्‍लॅटची किंमत सुमारे ३४ कोटी रुपये आहे. त्‍यांनी वर्सोवामध्‍येही एक फ्‍लॅट खरेदी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT