ओटीटी एक चांगला प्लॅटफॉर्म | पुढारी

ओटीटी एक चांगला प्लॅटफॉर्म

गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचे एक महत्त्वाचे माध्यम झाले आहे. काहीवेळा ओटीटीवर दाखवल्या जाणार्‍या द़ृश्यांमुळे अनेकदा यातील कलाकृतींना प्रेक्षक विरोध करत असतात. ओटीटीवर महिलांचे योग्य चित्रण केले जात नाही, असेही अनेकदा बोलले जाते. आता यावर दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी भाष्य केले आहे. आता ते त्यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या टाळेबंदीवर आधारित ‘इंडिया लॉकडाऊन’ हा भांडारकर दिग्दर्शित चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरून भेटीला येत आहे. यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, हो, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अभिनेत्रींना उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. फक्त महिला कलाकारच नाही, तर अभिनेत्यांनाही ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे खूप चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.

Back to top button