vijay deverakonda 
Latest

HBD Vijay Deverakonda : कधी काळी घराचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते; आणि आज कोटींचा मालक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) चा आज ३३ वा वाढदिवस आहे. त्याला सर्वाधिक ओळख 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. नंतर याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात आला, ज्यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाची हिंदी आवृत्तीही ब्लॉकबस्टर ठरली होती. विजयच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तेही खूप मनोरंजक आहे. तो आज कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. पण, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याच्याकडे घराचे भाडे भरण्यासाठीही पैसे नसायचे. (Vijay Deverakonda)

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा त्याच्या स्टायलिश लुकसाठी खूप प्रसिद्ध आहे. दक्षिणेत त्याची लोकप्रियताही खूप आहे. त्याच्या छोट्याशा कारकिर्दीतही त्याने आपली जबरदस्त फॅन फॉलोईंग कायम ठेवलीय. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच वेडे असतात. विजय देवरकोंडा हा भविष्यातील पॅन इंडिया स्टार आहे. तो त्याच्या आगामी 'लायगर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. जगन्नाथ पुरी दिग्दर्शित चित्रपटात अनन्या पांडे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

विजय देवरकोंडा
विजय देवरकोंडा

प्रसिद्ध अमेरिकन बॉक्सर माइक टायसनदेखील विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 22 ऑगस्ट रोजी हिंदी, तमीळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम् भाषांत रीलिज होणार आहे. चित्रपटात राम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही भूमिका आहेत.

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडाच्या जीवनशैलीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला आहे. एवढेच नाही तर त्याला आर्थिक चणचणही सहन करावी लागली आहे. पण, आता तो सुमारे ३० कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. (Net Worth 2022)

विजय देवरकोंडा

कोट्यवधींचा मालक

विजयचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६ कोटी रुपये आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच तो चित्रपटांमधून झालेल्या नफ्यातही वाटा उचलतो. चित्रपटांव्यतिरिक्त, तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनदेखील भरपूर कमाई करतो. यासाठी तो भरमसाठ मानधनदेखील घेतो.

रिपोर्ट्सनुसार, विजय एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी घेतो. यावेळी त्याला 'लायगर' चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन मिळाले आहे. हैदराबाद ज्युबली हिलवर त्यांचा एक आलिशान बंगला आहे, त्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

विजय देवरकोंडा

गाड्यांचा शौकीन

विजय गाड्यांचा शौकीन असून त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, ऑडी, मर्सिडीज अशी अनेक महागड्या गाड्या आहेत. या वाहनांची किंमतही करोडोंमध्ये आहे.

विजय देवरकोंडा

मीडिया रिपोर्टनुसार, विजयला अर्जुन रेड्डी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांनी या पुरस्काराचा लिलाव करून मिळालेली रक्कम आपत्ती मदत निधीत जमा केली होती.

विजय देवरकोंडा
विजय देवरकोंडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT