nayanthara 
Latest

Vignesh-Nayanthara : नयनताराने जुळ्या मुलांसोबत साजरा केला पोंगल (Photos)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विग्नेश शिवन (Vignesh-Nayanthara) आणि नयनतारा (Vignesh-Nayanthara) ने सोशल मीडियावर दोन्ही जुळ्या मुलांसोबत आपला फॅमिली फोटो शेअर केला आहे. या कपलने आपल्या दोन जुळ्यांसोबत पोंगल साजरा केला.

विग्नेश शिवन-नयनतारा साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल्सपैकी एक आहेत. दोघांनी ९ जून २०२२ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या चार महिन्यांनंतर ते जुळ्या मुलांचे पालक झाले. आपल्या दोन्ही मुलांची नावे त्यांनी यूइर आणि उलगम अशी ठेवली आहेत. दरम्यान, विग्नेश शिवनने आपल्या फॅमिलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हे कपल पॅरेंटहुड लाईफ एन्जॉय करत आहे.

फोटोमध्ये विग्नेश-नयनतारा हसत कॅमेरासमोर पोझ देत आहेत. विग्नेशने जुळ्या मुलांना हातात घेतले आहे. नयनताराने केसांच्या भांगेत सिंदूर, कपाळावर टिकली आणि केसांत गजरा लावलेला दिसत आहे. यलो कलरच्या सूटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. भगवान शिव आणि पार्वती यांच्या प्रतिमाही फोटोत दिसत आहे. त्यांनी फोटोला कॅप्शन लिहिली आहे की- 'पोंगालू पोंगल…तुम्हाला आणि तुमच्या सर्व प्रियजनांना या जगातील सर्व आनंद मिळो.' फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये पोंगलचे लोकगीत ऐकू येत आहे.

नयनतारा- विग्नेशची लव्हस्टोरी

२०१५ मध्ये नयनतारा आणि विग्नेश शिवन यांची पहिली भेट झाली होती. चित्रपट नानुम राऊडी धानमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या कपलने ९ जून, २०२२ रोजी लग्न केले.

नयनताराचे आगामी चित्रपट

नयनतारा सुपरस्टार शाहरुख खानसोबत चित्रपट 'जवान' मध्ये दिसणार आहे. एटली द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट 2 जून, २०२३ रोजी रिलीज होईल. 'जवान' चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता विजय सेतुपतिदेखील मुख्य भूमिकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT