फाईल फोटो 
Latest

Awade and Mahadik : विधानपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान प्रकाश आवाडे आणि महादेवराव महाडिक यांच्यातील व्हिडिओने खळबळ

backup backup

Awade and Mahadik : कोल्हापूर जिह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यात जोरदार लढत होताना दिसत आहे. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात कोण उतरणार याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू होती. राहुल आवाडे की शौमिका महाडिक यांच्या नावाची चर्चा होती. या चर्चेला पुर्णविराम देत अखेर भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Awade and Mahadik : राहुल आवाडे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार

माजी आमदार महादेवरावर महाडिक त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून नेहमी चर्चेत असतात. दरम्यान, काल इचलकरंजी येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप आणि मित्रपक्षांची बैठक घेण्यात आली. या दरम्यान आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने येथील ताराराणी पक्षाच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती.

जि.प. सदस्य राहुल आवाडे आगामी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवतील, असे सूतोवाच आ. प्रकाश आवाडे यांनी केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील उपस्थित होते. आ. पाटील यांचे स्मितहास्य व आ. आवाडे यांच्या वक्तव्याला उपस्थितांनी दिलेली दाद यामुळे हा विषय चांगलाच चर्चेचा बनला होता. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, महादेवराव महाडिक, आ. प्रकाश आवाडे आदींसह प्रमुखांच्या उपस्थितीत ताराराणी पक्ष कार्यालयात नगरसेवकांची बैठक झाली.

विधान परिषद निवडणुकीसाठी राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा होती. मात्र, अमल महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. हाच धागा पकडत स्वागतावेळी आ. आवाडे यांनी बोलताना "विधानपरिषदेसाठी आमच्या राहुलच्या नावाची सुद्धा चर्चा चालू होती, पण आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि अमलची उमेदवारी फायनल केली." हे ऐकताच महादेवराव महाडिक यांनी त्यांना मधेच थांबविले आणि म्हणाले, "नाही, नाही असं काही नाही! तुम्ही म्हटला तर आम्ही तयार आहोत त्यासाठी." या दरम्यान महादेवराव महाडिकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे बघत हात जोडले.

मात्र, त्यावर आवाडे यांनी गैरसमज करू घेऊ नका, आता राहुलला संधी मिळाली नसली तरी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल आवाडे उमेदवार असतील असे सूतोवाच केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी व टाळ्यांचा कडकडाट केला तर आ. चंद्रकांत पाटील यांनी स्मितहास्य केले.

सतेज पाटील यांच्या दाव्याला तथ्य नाही : चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सतेज पाटील 280 मतदार पाठीशी असल्याचा दावा करत आहेत पण त्यामध्ये तथ्य नाही. भाजपच्या पाठीशी विजय साध्य करण्याइतकी मते असून, ते निकालातून स्पष्ट होणार आहे. असा उल्लेख करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर विधान परिषदेत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT