Latest

Uttarakhand Ramnagar Accident : उत्तराखंडच्या रामनगरमध्ये धेला नदीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Uttarakhand Ramnagar Accident) उत्तराखंडमधील रामनगरमध्ये गुरुवारी एक भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रामनगरमध्ये धेला कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ERTIGA कारमध्ये १० जण असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. या अपघातातून एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे. ती गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. नदीत पडलेल्या कारला ट्रॅक्टरच्या सहाय्याने खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Uttarakhand Ramnagar Accident). नदीतून ४ मृतदेह बाहेर काढले असून ५ जणांचे मृतदेह अद्याप अडकून पडले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

या अपघातातून बचावलेल्या मुलीला रामनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या कारमध्ये ४-४ मुली असल्याचे सांगण्यात येते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले आठ जण पंजाबमधील पटियाला येथील असून त्यात ५ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. तर २ महिला रामनगर येथील आहेत.

जिम कॉर्बेटचा मार्ग

जिथे हा अपघात झाला तो रस्ता जिम कॉर्बेटकडे जातो. या भागात रात्री उशिरा पाऊस झाला, त्यानंतर पाण्याचा प्रवाह तीव्र होऊन रस्त्यावर पाणी वाहत होते. यापूर्वीही या ठिकाणी पूल बांधण्याची चर्चा प्रशासन आणि शासनाकडून झाली होती, मात्र तसे न झाल्याने यापूर्वी अनेक मोठे अपघात झाले आहेत.

कुमाऊ रेंजचे डीआयजी आनंद भरण यांनी पुष्टी केली की, आज सकाळी पावसामुळे कार पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकली. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून १ मुलगी वाचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT