Uncategorized

नरेंद्र मोदी, “स्वातंत्र्यानंतर दिल्लीत काही कुटुंबियांसाठी नव-निर्माण झाले”

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : "स्वातंत्र्यानंतर दिल्लीमध्ये काही निवडक कुटुंबियांच्यासाठी नव-निर्माण करण्यात आले. मात्र, आज देशातील त्या संकुचित विचाराला मागे सोडून गौरवपूर्ण निर्माण करण्यात येत आहे. त्यांना भव्यता मिळत आहे. हे आमचं सरकार आहे, ज्यांनी दिल्लीमध्ये बाबासाहेब मेमोरियलचं निर्माण केलं आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ काॅन्फ्रेंसिंगद्वारे गुजरातमधील सोमनाथ येथील नव्या सर्किट हाऊसचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी काॅंग्रेसवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, "पहिल्यांदा ऐतिहासिक स्थळांकडे दुर्लक्ष केलं जात होतं. पण, आता सर्वांच्या प्रयत्नाने विकसित केले जात आहेत. प्रायव्हेट सेक्टरसुद्धा अशा कामांत पुढे येत आहेत. 'इनक्रेडिबल इंडिया और अपना देश', हे अभियान आज देशांचा गौरवतेला जगासमोर आणत आहे."

"आपण ऐकलेलं असतं की, परदेशांमध्ये पर्यटन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेत खूप मोठे योगदान असते. पण, आपल्या देशामधील प्रत्येक राज्यात प्रत्येक क्षेत्रांत अशा योगदानाची शक्यता असते. वेगवेगळ्या देशांमधून कित्येक सोमाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवर्षी सुमारे १ करोड लोक या ठिकाणी भेट देतात. परतत असताना ते इथला विचार घेऊन आपल्या देशात जातात. मागील ७ वर्षांपासून देशाने अशा शक्यतांचा विचार करून जोरदार काम केलेलं आहे", अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT