Uncategorized

जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर 

अंजली राऊत

जळगाव : चेतन चौधरी

शासकीय, निमशासकीय कार्यालयायांत कर्मचाऱ्यांना 'लाच देणे आणि घेणे हा गुन्हा' आहे असा फलक लावलेला सर्वच ठिकाणी दिसून येतो. मात्र, असे असले तरी त्याचा यंत्रणेवर कितपत परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. जळगाव जिल्ह्यात एसीबीने वर्षभरात केलेल्या २७ कारवायांमध्ये ३८ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात पोलिस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारीच आघाडीवर आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षभराच्या कालावधीत जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान २७ लाचखोरीचे गुन्हे उघडकीस आले. यात बहुतांश शासकीय कर्मचारी वर्ग तीनचे आहेत. यात सर्वांत जास्त महसूल, पोलिस विभाग आणि अन्य विभागांत लाचखोरीचे गुन्हे आहेत. गेल्या सहा वर्षांतील आकडेवारी पाहता सर्वसामान्यांच्या जागरूकपणामुळे आतापर्यंत १७८ लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

सहा वर्षांत १७८ लाचखोर अटकेत
२०१७ मध्ये २६ जणांना अटक, २०१८ मध्ये ३०, २०१९ मध्ये ३१, २०२० मध्ये २०, २०२१ मध्ये ३३, तर २०२२ मध्ये ३८ अशा एकूण १७८ लाचखोरांना एसीबीने अटक केली आहे.

विभागनिहाय कारवाई
महसूल विभागातील : तहसील कार्यालय चोपडा, कोतवाल व खासगी इसम किनगाव, तहसीलदार- चालक- तलाठी- बोदवड, जळगाव तहसील कार्यालय खासगी इसम, अव्वल कारकून कोषागार शाखा, संजय गांधी निराधार योजना जळगाव, मंडल अधिकारी व तलाठी अमळनेर अशा एकूण 7 वेळा कारवाई झाली आहे.

पोलिस विभाग : पोलिस उपनिरीक्षक मेहुणबारे पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस नाईक चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन, पोलिस हवालदार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन, पोलिस हवालदार पाचोरा पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक सावदा पोलिस स्टेशन अशा एकूण 5 वेळा कारवाई झाली आहे. या शिवाय इतर विभागांमध्ये लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT