पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील आपेगाव ( आपेगाव चोरी ) येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विलास कापसे यांच्या घरातील तीन तोळे सोने-चांदी दागिन्यासह रोख ४५ हजार रुपये लंपास केले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडजी येथील चोरीच्या घटनेचा तपास सुरू असताना आपेगाव येथील विलास कापसे यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. ही घटना रविवारी (दि. १२) रोजी मध्यरात्री ३, ३० वाजण्याच्या सुमारास घडली.
विलास कापसे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरांनी घरात प्रवेश करून तीन तोळे सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख ४५ हजार रुपये घेवून पोबारा केला. विलास कापसे यांनी पाेलिसांना याची माहिती दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांना या घटनेची माहिती देऊन तात्काळ पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, बीट जमादार नुसरात शेख.पो .कॉ दुल्हन यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचलं का?