कन्नड (जि.औरंगाबाद ), पुढारी वृत्तसेवा : मुख्याध्यापकावर तलवारीने सपासप प्राणघातक हल्ला करून पळून जाणाऱ्या हल्लेखोरास आठ तासा नंतर जेरबंद करण्यास कन्नड पोलिसांना यश आले आहे. शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मकरणपूर येथील रहदारी असलेल्या चौकात मुलींची छेड काढण्यास मज्जाव करणाऱ्या मुख्याध्यापक व अधिक्षकाचा राग आल्याने मारून टाकण्याच्या उद्देशाने मज्जीद जमील शेख वय २४ रा.मक्रणपूर याने तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले होते.
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करून जखमी झालेले मुख्याध्यापक ए. पी.चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी मज्जीद जमिल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. हल्लेखोर हल्ला करून पसार झाला होता.याप्रकरणी सर्व शिक्षक संघटनांनी जो पर्यंत आरोपीस अटक करण्यात येत नाही तो पर्यंत जिल्ह्यातील शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी तालुक्यातील सर्व अस्थापनाच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
शहर पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि. दिनेश जाधव यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना 24 तासाच्या आत आरोपीस पकडण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले होते. त्यानुसार तीन पथके आरोपीच्या मागावर तैनात करण्यात आले होते. पुणे येथील पथकातील सहा पोनि. दिनेश जाधव, पो.ना.रामचंद्र बोंद्रे, पो.कॉ.दिलवरसिंग वसावे पोलिसांनी अत्यंत चोखपणे आरोपीचा माग काढत अवघ्या आठ तासात आरोपी पुण्याकडे पलायन करत असताना रांजणगाव ता.जी.पुणे येथे जेरबंद करून ताब्यात घेतले.
तपासकामी पोलीस अधीक्षक निमित गोयल,अपर पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांनी गुन्ह्याच्या तपासाकरीता व आरोपीच्या शोधाकरीता सपोनि एस.व्ही.खटके, सपोनि डी.बी.वाघमोडे, सपोनि दिनेश जाधव, पोउपनि. सर्जेराव जाधव, भुषण सोनार पो.अंमलदार पोहवा संतोष जिबोले, जयंत सोनवणे, पोना रविंद्र बोंद्रे, पो.अंमलदार सोमिनाथ गवळे, सागर सुलाने, आनंद पगारे, दिलवरसिंग वसावे यांची स्वतंत्र तीन पथके तयार केली होती. आरोपी मज्जीद शेख यापुर्वीही शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
हे ही वाचलं का