मराठीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला अपघात | पुढारी

मराठीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला अपघात

पौड, पुढारी वृत्तसेवा:  प्रसिद्धी अभिनेत्री किशोरी शहाणे – वीज यांच्या गाडीला मुळशी तालुक्यातील हाडशी येथे अपघात झाला आहे.मुंबईहून मुळशी तालुक्यातील गिरीवन येथे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसल्याने अपघात झाला.कोणालाही यात दुखापत झालेली नाही असे शहाणे यांनी ‘सोशलमिडीया’च्या माध्यमातून सांगितले आहे.यावेळी त्यांच्या समवेत त्याचे पती निर्माते – दिग्दर्शक दिपक वीज हे सुध्दा होते.

किशोरी शहाणे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत.’

किशोरी शहाणे -वीज सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. नृत्याचे, सहकलाकारांसोबतचे, भटकंतीचे तसेच पती दीपक वीज यांच्यासोबतचे व्हिडीओ, फोटोज त्या नेहमीच शेअर करत असतात.

हे ही वाचलं का  

Back to top button