पुणे : उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्राॅली अंगावर पडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू | पुढारी

पुणे : उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्राॅली अंगावर पडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

मंचर, पुढारी वृत्तसेवा :  मंचर-पारगाव रस्त्यावरील मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडून ऊसताेड मजूर असलेल्या दाेन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबत अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मंचर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरगुडसर येथील महादू संभू वळसे यांच्या शेतातील ऊस ताेडणी करून ट्रॅक्टर (एमएच 16 सीव्ही 3514) मध्ये ऊस भरून घेऊन जात होता. या ट्रॅक्टरमध्ये जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे (वय 50) व भीमाबाई यादव गांडाळ (वय 52, सध्या रा. दत्तात्रयनगर, पारगाव कारखाना, मूळ रा. घारगाव गाढवलाेळी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दाेघी बहिणी बसल्या हाेत्या. ट्रॅक्टर शेताच्या बांधावरून वळसेमळा ते गण्या डाेंगरानजीक आल्यानंतर मेंगडेवाडी रस्त्याच्या तीव्र उतारावर पलटी हाेऊन ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दाेघी बहिणींच्या अंगावर भरलेली उसाची टायर गाडी पडली. या उसाखाली त्या दाेघी दबल्याने त्यातील एका बहिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, दुसरीला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाच्या विराेधात जिजाबाई दुधवडे यांचा मुलगा उल्हास पंढरीनाथ दुधवडे (वय 25, रा. पारगाव कारखाना, मूळ रा. घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी मंचर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास पाेलिस निरीक्षक सतीश हाेडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक साेमशेखर शेटे करीत आहेत.

हे ही वाचलं का  

Back to top button