Uncategorized

नाथसागर धरणाचे १८ दरवाजे तीन फुटांनी उघडले; ५६ हजार क्युसेक पाण्याचा गोदावरीत विसर्ग

अनुराधा कोरवी

पैठण; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन आठवड्यापासून पैठण येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात वरील धरणातून आणि पाणीलोट क्षेत्रात सतत होणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक जमा होत आहे. यामुळे शुक्रवारी (दि.१६) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान नाथसागर धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उचलून गोदावरी नदीत ५६ हजार ५९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.

धरण नियंत्रण विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ९९ टक्के भरलेल्या धरणात जमा होणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्याचे नियोजन सुरू होते. याच दरम्यान पुन्हा शुक्रवारी (दि.१६ रोजी) सकाळी वरील धरणातून येणारे पाण्याची आवक वाढली. यामुळे येथील नाथसागर धरणाचे यापूर्वी उघडलेले २७ पैकी क्रमांक १० ते २७ असे एकूण १८ दरवाजे तीन फूट उंचीवर स्थिर करण्याचा निर्णय घेत गोदावरी नदीत ५६ हजार ५९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

दरम्यान नाथसागर धरणाच्या वरील भागातील नागमठाण २३०००, देवगड १६८८२, शेंदूरवादा ५३८ या परिसरातील धरणातून एकूण ४० हजार ४२० क्युसेक पाण्याचा आवक शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान वाजता सुरू असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. शुक्रवारी रोजी सकाळपासूनच पैठण शहरासह ग्रामीण विविध ठिकाणी पाऊस सुरू आहे. तालुक्यात आत्तापर्यंत ६२४४.०० मी.मी पाऊस पडल्याची नोंद महसूल विभागात करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार गिरजाशंकर आवळे यांनी 'दैनिक पुढारी' शी बोलताना दिली आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT